साहित्यासाठी अडीच कोटींची तरतूद

By Admin | Updated: August 28, 2016 01:36 IST2016-08-28T01:36:14+5:302016-08-28T01:36:14+5:30

जिल्हा परिषदेच्या वतीने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सवलतीवर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते.

Provision of 25 crores for material | साहित्यासाठी अडीच कोटींची तरतूद

साहित्यासाठी अडीच कोटींची तरतूद

अनुसूचित जातींना लाभ : जि. प.ची योजना
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या वतीने अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांसाठी सवलतीवर कृषी साहित्य उपलब्ध करून देण्याची योजना राबविली जाते. या योजनेंतर्गत २०१६-१७ या वर्षासाठी २ कोटी ५६ लाख ५० हजार रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
शेतीमध्ये आधुनिक साधनांचा वापर आवश्यक असला तरी सदर साहित्य महागडे राहत असल्याने ते खरेदी करणे गरीब शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे अशा शेतकऱ्यांना अनुदानावर कृषी साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा परिषदेला स्वतंत्र निधी प्राप्त होते. अनुसूचित जाती उपयोजना क्षेत्रासाठी २०१६-१७ या वर्षासाठी २ कोटी ५६ लाख ५० हजार रूपयांची तरतूद केली आहे. सदर तरतूद त्या तालुक्यातील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येनुसार करण्यात आली आहे. गडचिरोली तालुक्यासाठी ४४ लाख ६६ हजार, आरमोरी तालुक्यासाठी २४ लाख १५ हजार, देसाईगंज ३० लाख ३ हजार, कुरखेडा १९ लाख ४ हजार, सिरोंचा ३८ लाख ९० हजार, कोरची ७ लाख ३१ हजार, धानोरा ८ लाख ३६ हजार, मुलचेरा ५ लाख ७९ हजार, अहेरी ३५ लाख ४४ हजारांची तरतूद केली आहे.

Web Title: Provision of 25 crores for material