शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
3
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI च्या विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
4
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
5
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
6
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
9
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
10
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
12
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
13
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
14
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
15
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
16
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
17
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
18
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
19
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
20
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील नक्षलग्रस्त व नक्षल पीडितांना सरकारी भूखंड उपलब्ध करून द्या; अतिक्रमण हटवू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2021 05:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलपीडित व नक्षलग्रस्त अशी जवळपास २००हून अधिक कुटुंबे आहेत. शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले म्हणून किंवा आमच्या विरोधात शासनाला मदत केली म्हणून त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी अत्याचार केलेले आहे. त्यांच्या घरादारांची तोडफोड करून त्यांना मारहाण करून गावाबाहेर हाकलले आहे. गडचिरोली जिल्हा केंद्रावर सुरक्षितता वाटल्याने त्यांनी या ठिकाणी रस्त्यालगत जागेवर अतिक्रमण करून लहान लहान दुकानांच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवीत आहेत.

लाेकमत न्यूज  नेटवर्कगडचिराेली : आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना शासन निरनिराळ्या योजनांच्या माध्यमातून जीवन जगण्याची संधी देत आहे. परंतु नक्षलींपासून पीडित व ग्रस्त असणाऱ्या लोकांना अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारच्या सोयी-सुविधा शासनाने दिलेल्या नाहीत. त्यामुळे अशा नक्षलग्रस्त व नक्षलपीडित परिवारांना सरकारी भूखंड उपलब्ध करून द्यावे व त्यांची पर्यायी व्यवस्था होईपर्यंत अतिक्रमित करून राहात असलेली दुकाने व घरे हटविण्यात येऊ नयेत, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे मुंबई येथे मंत्रालयात भेट घेऊन केली.गडचिरोली जिल्ह्यात नक्षलपीडित व नक्षलग्रस्त अशी जवळपास २००हून अधिक कुटुंबे आहेत. शासनाच्या पोलीस भरती प्रक्रियेत सहभागी झाले म्हणून किंवा आमच्या विरोधात शासनाला मदत केली म्हणून त्यांच्यावर नक्षलवाद्यांनी अत्याचार केलेले आहे. त्यांच्या घरादारांची तोडफोड करून त्यांना मारहाण करून गावाबाहेर हाकलले आहे. गडचिरोली जिल्हा केंद्रावर सुरक्षितता वाटल्याने त्यांनी या ठिकाणी रस्त्यालगत जागेवर अतिक्रमण करून लहान लहान दुकानांच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवीत आहेत. परंतु शासनाने त्यांना कोणत्याही प्रकारची मदत केलेली नाही.  जिथे आपण आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करीत आहोत तिथे मात्र नक्षलपीडित व नक्षलग्रस्त   कुटुंबांना कोणत्याही सोयीसुविधा दिलेल्या नाहीत, उलट त्यांचे अतिक्रमण असल्याचे दाखवून त्यांना हटविण्याचा प्रयत्न करीत आहोत. यामुळे जिल्ह्यातील या पीडित लोकांमध्ये शासनाविषयी प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन अशा नक्षलग्रस्त व नक्षलपीडित लोकांना सरकारी भूखंड उपलब्ध करून द्यावेत व त्यांची जोपर्यंत स्थायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत  त्यांचे अतिक्रमण, अतिक्रमित घरे व दुकाने कोणत्याही परिस्थितीत हटविण्यात येऊ नयेत, असे आमदार डॉ. देवराव होळी यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

टॅग्स :Dilip Walse Patilदिलीप वळसे पाटीलDevrao Holiदेवराव होळी