मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 06:00 AM2020-01-06T06:00:00+5:302020-01-06T06:00:22+5:30

कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर गादी पध्दतीत पाट काढून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे.

Plantation of Carle crop in Mohatola area over one hundred acres | मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड

मोहटोला परिसरात दीडशे एकरात कारले पिकाची लागवड

googlenewsNext
ठळक मुद्देठिबक सिंचन व पाटाद्वारे होताहे पाणी पुरवठा : अनेक शेतकऱ्यांकडून मंडप पद्धती तर काही ठिकाणी गादी पद्धतीचा वापर

अरविंद घुटके ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : भाजीपाला पिकाचे उत्पादन म्हटले की, देसाईगंज तालुक्यातील मोहटोला किन्हाळा परिसर असे समिकरण जुळलेले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अल्पभूधारक शेतकरी आहेत. मात्र येथे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्या जाते. या भागात यंदा जवळपास दीडशे एकर जागेत कारले पिकाची लागवड करण्यात आली आहे.
कारले पिकाची लागवड दोन पध्दतीने केल्या जाते. यात गादी पध्दती व मंडप पध्दतीचा अंतर्भाव आहे. मोहटोला परिसरात सध्या दोन्ही पध्दतीने कारले पिकाची लागवड करण्यात आली असल्याने शेतशिवार कारल्याच्या शेतीने हिरवेगार दिसत आहे. मंडप पध्दतीकरिता ठिबक सिंचनाचा तर गादी पध्दतीत पाट काढून सिंचनाची सुविधा करण्यात आली आहे. वास्तविक कारले हे वेलवर्गीय पीक आहे. या वेलींना आधार दिल्यावर त्याची चांगली वाढ होते. फळधारणेचे प्रमाण मोठे असते. कारले पिकाच्या शेतीत मंडप केल्याने फुटवे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढतात. त्यामुळे पाने व फळे यांचा जमिनीशी संपर्क येत नाही. त्यामुळे ओलावा लागून ती सडण्याची भिती नसते. कीड व रोगाचे प्रमाण देखील कमी राहते. फळे लोंबकळत राहिल्यामुळे त्याची वाढ सरळ होते. सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळाचा रंग चांगला राहतो. गादी पध्दतीत काही फुटवे आल्यानंतर दुसरे फुटवे मर्यादीत स्वरूपात येतात. या वेली एकमेकात गुंतल्यामुळे सारख्या प्रमाणात प्रत्येक वेलीस सूर्यप्रकाश मिळत नाही.
कारले लागवडीची पध्दत कोणतीही असली तरी या भागातील शेतकरी भरघोस उत्पादनाची आस लावून आहेत. जेव्हा कारल्याचे पीक निघण्यास सुरूवात होते, तेव्हा देसाईगंजच नव्हे तर नागपूर शहरातील अनेक व्यापारी कारले खरेदीसाठी मोहटोला व किन्हाळात दाखल होत असतात. किन्हाळा-अरततोंडी रस्त्याच्या कडेला असलेल्या अर्धा एकर शेतात शेतकरी उमेश पत्रे यांनी कारले पिकाची लागवड केली आहे.

दोन लाख रुपयाचे मिळते उत्पन्न
कारले पिकाच्या लागवडीसाठी कृषी सहायकापासून तर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असून उत्पादन खर्च वजा जाता अंदाजे दोन लाख रुपयाचे उत्पन्न अर्धा एकरातील कारले पिकातून मिळणार आहे, अशी अपेक्षा शेतकरी उमेश पत्रे यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

Web Title: Plantation of Carle crop in Mohatola area over one hundred acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.