शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हाइट हाऊस गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
3
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
4
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
5
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
6
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
8
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
9
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
10
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
11
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
13
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
14
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
15
"छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द खपवून घेणार नाही...", रितेश देशमुखने धीरेंद्र शास्त्रींना स्पष्ट शब्दांत सुनावलं
16
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
17
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
18
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
19
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
20
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुलावर खांब लावले मात्र पथदिव्यांचा पत्ता नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2020 05:00 IST

सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाचे बांधकाम झाल्याबरोबर रस्ता व पुलाच्या दोन्ही बाजूला पथदिव्यांसाठी खांब उभारले आहेत. या पथदिव्यांना वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीची परवानगी असणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्राणहिता नदीवरील पूल : सिरोंचा नगर पंचायतीकडून दिरंगाई, दोन वर्षांचा कालावधी उलटला

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : प्राणहिता नदीवर बांधलेल्या पुलावर पथदिवे लावण्यासाठी पूल बांधणाऱ्या कंपनीने दोन वर्षांपूर्वीच वीज खांब उभारले आहेत. मात्र पथदिवे लावण्यासाठी सिरोंचा नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने विद्युत पुरवठा मिळू शकला नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून केवळ खांबच पुलाची शोभा वाढवत आहेत.सिरोंचा शहराला लागून असलेल्या प्राणहिता नदीवर तेलंगणा सरकारने १८ पिल्लरचा मोठा पूल बांधला आहे. सिरोंचा शहरातील नागरिक पुलावर रात्री व पहाटेच्या सुमारास फिरायसाठी जातात. या नागरिकांसाठी सोयीचे व्हावे, यासाठी पूल बांधणाऱ्या हैदराबाद येथील कंपनीने पुलाचे बांधकाम झाल्याबरोबर रस्ता व पुलाच्या दोन्ही बाजूला पथदिव्यांसाठी खांब उभारले आहेत. या पथदिव्यांना वीज पुरवठा करण्यासाठी स्थानिक नगर पंचायतीची परवानगी असणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक असलेले नाहरकत प्रमाणपत्र नगर पंचायतीने दिले नाही. त्यामुळे पथदिवे लावण्यात आले नाही. पथदिव्यांमुळे सिरोंचा शहरातील नागरिकांसाठी सोयीचे झाले असते. त्याचबरोबर या पुलाचे सौंदर्य पथदिव्यांमुळे वाढण्यास मदत झाली असती. विशेष म्हणजे पुलाची निर्मिती झाल्यापासून तीन वर्षांपर्यंत देखभाल व दुरूस्तीचे काम कंपनीकडे आहे. त्यामुळे तीन वर्षांचे वीज बिल व इतर खर्च कंपनी भरणार आहे. तसे नगर पंचायतीला कळविले आहे. मात्र नगर पंचायतीने नाहरकत प्रमाणपत्र दिले नसल्याने पुढची प्रक्रिया रखडली आहे.सिरोंचा नगर पंचायतीच्या मुख्याधिकारीपदी आपण नुकतेच रूजू झालो आहोत. त्यामुळे हे प्रकरण आपल्याला माहित नाही. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नगर पंचायतीत आपली भेट घ्यावी. त्यांना तत्काळ नाहरकत प्रमाणपत्र दिले जाईल.- विश्वास पाटील,मुख्याधिकारी, सिरोंचा

टॅग्स :electricityवीजroad safetyरस्ते सुरक्षा