शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगांना मिळणार मोफत कृत्रिम अवयव व उपकरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2022 05:00 IST

तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, ५ मे रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात केले होते.  पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या पुढाकाराने आणि अलिस्को कंपनी - मुंबई, जनरल इन्श्युरन्स कंपनी - मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दिव्यांग तपासणी शिबिरात जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी २६० दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरले आहेत. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागातील आदिवासी नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नाही. गरजू आदिवासी नागरिकांना तो लाभ मिळावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकारातून मोफत कृत्रिम अवयव वाटप केले जाणार आहे. त्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, ५ मे रोजी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात केले होते. पोलीस दलाच्या दादालोरा खिडकीच्या पुढाकाराने आणि अलिस्को कंपनी - मुंबई, जनरल इन्श्युरन्स कंपनी - मुंबई यांच्या सहकार्याने आयोजित या दिव्यांग तपासणी शिबिरात जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागातील ३१६ दिव्यांगांनी तपासणी करून घेतली. त्यापैकी २६० दिव्यांग नागरिक हे कृत्रिम अवयव उपकरणासाठी पात्र ठरले आहेत. ज्या दिव्यांगांना कृत्रिम अवयव उपकरणाची आवश्यकता आहे, अशा दिव्यांग नागरिकांना गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने ते अवयव व उपकरणे मोफत मिळवून देण्यात येणार आहेत. यावेळी दिव्यांग नागरिकांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अंकित गोयल म्हणाले, आम्ही जिल्ह्यातील सर्व दिव्यांग नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवून देणार आहोत. आपल्या सर्व समस्या दूर व्हाव्यात यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक समीर शेख (प्रशासन), अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे (नक्षल ऑपरेशन), अप्पर पोलीस अधीक्षक अहेरी अनुज तारे, कमलेश यादव सी.एस.आर. कन्सल्टंट मुंबई, डॉ. सतीश गोगुलवार संयोजक, ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ हे उपस्थित होते.कार्यक्रमासाठी नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी भावेश कावरे व सर्व पोलीस अंमलदारांनी परिश्रम घेतले.

२४७३ जणांना रोजगार, २७३७ जणांना प्रशिक्षण-    आजपर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडून ९८० दिव्यांगांना यूआयडी कार्ड, ६५० दिव्यांगांना एसटी प्रवास सवलत योजनेचे प्रमाणपत्र, २७६ जणांचे संजय गांधी निराधार योजनेचे प्रस्ताव पाठविले आहेत. तसेच रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक, नर्सिंग असिस्टंट, हॉस्पिटॅलिटी, ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिशिअन, प्लम्बिंग, वेल्डिंग, जनरल ड्युटी असिस्टंट, फील्ड ऑफिसर अशा एकूण २४७३ युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Policeपोलिस