शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

मागील वर्षभरात हिवतापाने घेतला आठ जणांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2022 05:00 IST

हिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार करून घ्यावेत. उपचार न घेतल्यास तसेच अर्धवट उपचार घेतल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. वांरवार ताप येऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिराेली जिल्हा हिवतापासाठी संवेदशील मानला जातो. मागील वर्षी २०२१ मध्ये जिल्ह्यात ८ लाख ७५ हजार १३४ रक्त नमुने घेतले. त्यात १२ हजार ३२६ रुग्णांचे रक्त दूषित आढळून आले तर ८ जणांचा मृत्यू झाला.  हिवतापावर मात करावयाची असेल तर सरकारी आरोग्य यंत्रणेच्या प्रयत्नाबरोबरच जनतेचा सहभाग व इतर सरकारी यंत्रणेचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे.  सर्व आरोग्य संस्थेत २५ एप्रिल रोजी जागतिक हिवताप दिन साजरा करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर १ ते ३० एप्रिल या कालावधीत हिवताप जन-जागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. 

ही आहेत लक्षणेहिवताप आजारात रुग्णांस थंडी वाजून ताप येतो व हुडहुडी भरते. हा ताप एक दिवसाआड किंवा दाेन दिवसाआड येतो. अंग दुखणे, डोके दुखणे तसेच रुग्णांस पांघरुण घ्यावेसे वाटते. नंतर घाम येऊन ताप कमी होतो आणि रुग्णास थकवा येतो. यासाठी हिवतापाचे लवकर निदान व त्वरित उपचार करून घ्यावेत. उपचार न घेतल्यास तसेच अर्धवट उपचार घेतल्यास हा आजार प्राणघातक ठरू शकतो. वांरवार ताप येऊन रुग्ण बेशुद्ध होऊ शकतो.

भविष्यात हिवताप आजाराचा उद्रेक होऊ नये म्हणून आरोग्य खात्यामार्फत सर्व प्रकारचे नियोजन करण्यात आले आहे. हिवताप आजारावर मात करण्यासाठी गावातील सर्व नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. त्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाययोजना जनतेने राबविणे गरजेचे आहे. दक्षता घेतल्यास डासांची उत्पत्ती होणार नाही व डास चावणार नाहीत. म्हणजे योग्य काळजी व वेळीच केलेला उपचार तुम्हांला होणाऱ्या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हातभार लावतो.  - डॉ. कुणाल मोडक,जिल्हा हिवताप अधिकारी

 

टॅग्स :Healthआरोग्य