अंनिसच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा

By Admin | Updated: September 15, 2016 02:04 IST2016-09-15T02:04:58+5:302016-09-15T02:04:58+5:30

स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात मंगळवारी पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या

Organizational discussion at Anees' meeting | अंनिसच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा

अंनिसच्या बैठकीत संघटनात्मक चर्चा

गडचिरोली : स्थानिक राणी दुर्गावती कन्या विद्यालयात मंगळवारी पार पडलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आढावा बैठकीत संघटनात्मक पैलूंवर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी शहर शाखेचे अध्यक्ष पंडित पुडके होते. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष विलास निंबोरकर, वरिष्ठ कार्यकर्ते विठ्ठलराव कोठारे उपस्थित होते. नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीचे तसेच अंनिसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचेही निवेदन करण्यात आले. नवीन शाखा निर्मिती, सदस्य नोंदणी, चळवळी संबंधित पुस्तकांची विक्री तालुकास्तरावर संघटनात्मक अडचणी, संघटनेसाठी आवश्यक निधीची निर्मिती, रिंगण नाट्य, पथनाट्य, सामाजिक प्रबोधन या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत अंनिसच्या महिला संघटक स्मिता लडके यांचा जिल्हा शाखेच्या वतीने पंडित पुडके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा शाखेचे प्रधान सचिव पुरूषोत्तम ठाकरे, संचालन गजानन राऊत तर आभार चांदेवार यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिवराम मोंगरकर, सुधाकर दुधबावरे, संध्या येलेकर, स्मिता लडके यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Organizational discussion at Anees' meeting