शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कृषी कार्यालयात उरले केवळ दोनच कर्मचारी

By admin | Updated: January 16, 2016 01:53 IST

१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत.

१८४ गावांचा भार : अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाची दैनावस्थाविवेक बेझलवार अहेरी१८४ गावातील हजारो शेतकऱ्यांचा भार वाहणाऱ्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी सुमारे १६ पदे मंजूर करण्यात आले आहेत. मात्र धक्कादायक बाब म्हणजे केवळ यातील दोनच पदे भरण्यात आली असून सुमारे १४ पदे रिक्त आहेत. मनुष्यबळाच्या अभावाने शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अडचण जात असून याचा फटका तालुक्यातील शेतकऱ्यांना बसत आहे. तालुका कृषी अधिकारी हे कार्यालय राज्य शासनाच्या अखत्यारित येते. या कार्यालयाच्या वतीने कृषी विकासाच्या ८० टक्के योजना राबविल्या जातात. त्यामुळे जिल्हा अधीक्षक कार्यालयाबरोबरच तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकारी कार्यालयसुद्धा स्थापन करण्यात आले आहे. अहेरी तालुक्यात एकूण १८४ गावे आहेत. यापैकी १५८ आबादी गावे तर २६ रिठ गावे आहेत. एकूण १४ हजार ४३२ हेक्टर क्षेत्रावर पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्याची एकूण लोकसंख्या १ लाख ३ हजार ७५९ एवढी आहे. यातील ९० टक्के नागरिक शेती हा एकमेव व्यवसाय करतात. त्यामुळे कृषी विभागाचे अहेरी तालुक्याच्या दृष्टीने विशेष महत्त्व आहे. अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात एकूण १६ पदे मंजूर आहेत. यामध्ये १ तालुका कृषी अधिकारी, १ कृषी अधिकारी, १ कृषी पर्यवेक्षक, १ कृषी सहाय्यक, १ तालुका सहाय्यक, २ अनुरेखक, १ सहाय्यक अधीक्षक, १ वरिष्ठ लिपीक, ४ कनिष्ठ लिपीक, १ वाहनचालक व ३ शिपाई असे एकूण १६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी कृषी पर्यवेक्षक व कनिष्ठ लिपीक असे दोनच पदे भरण्यात आली असून उर्वरित सुमारे १४ पदे रिक्त आहेत. विविध शासकीय योजनांच्या कामासाठी शेतकरीवर्ग तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये येतात. मात्र या कार्यालयात शुकशुकाट राहते. कमी मनुष्यबळामुळे एखाद्या योजनेसाठी अर्ज केल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्यास महिन्याचा कालावधी लागतो. कधीकधी तर योजनेचा कालावधीही निघून जातो. एकाच अर्जासाठी सतरावेळा या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागतात. त्यामुळे शेतकरीवर्ग त्रस्त झाला आहे. दुसरीकडे कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण वाढत चालला आहे. त्यामुळे कर्मचारीसुद्धा त्रस्त झाले असून पदे भरण्याची मागणी होत आहे. ३० वर्षांपासून कार्यालय भाड्याच्या खोलीतजिल्हा निर्मितीबरोबरच अहेरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचीही स्थापना करण्यात आली. मात्र या कार्यालयाला अजूनपर्यंत स्वतंत्र इमारत शासनाने बांधून दिली नाही. त्यामुळे सदर कार्यालय ३० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटूनही भाड्याच्याच खोलीत सुरू आहे. कार्यालयासाठी कमी जागा उपलब्ध असल्याने दस्तावेज ठेवण्यासही अडचण निर्माण होत आहे.मंडळ कृषी अधिकारी कार्यालयातील १७ पैकी १० पदे भरण्यात आली आहेत. तर ७ पदे रिक्त आहेत. रिक्तपदांमध्ये मंडळ कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सेवक ४, अनुरेखक १ व शिपायाचा १ पद रिक्त आहे.