ओपीडी रूग्णांची संख्या निम्म्यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:34 IST2021-01-13T05:34:30+5:302021-01-13T05:34:30+5:30

गडचिराेली : स्थानिक जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात (ओपीडी) महिन्याला सरासरी १५ हजार रुग्णांची तपासणी केली जात हाेती. काेराेनामुळे बाह्यरूग्ण ...

The number of OPD patients has halved | ओपीडी रूग्णांची संख्या निम्म्यावरच

ओपीडी रूग्णांची संख्या निम्म्यावरच

गडचिराेली : स्थानिक जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात (ओपीडी) महिन्याला सरासरी १५ हजार रुग्णांची तपासणी केली जात हाेती. काेराेनामुळे बाह्यरूग्ण विभागात उपचार घेणाऱ्यांची संख्या निम्म्यावर पाेहाेचली. ही स्थिती अजूनही कायम आहे.

सर्दी, खाेकला, ताप, उच्चरक्तदाब, मधुमेह आदी राेगांनी ग्रस्त रुग्ण जिल्हा रुग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागातच उपचार घेतात. तपासणी व औषधे माेफत मिळत असल्याने बहुतांश नागरिक बाह्यरूग्ण विभागात उपचार घेण्यासाठी पसंती दर्शवितात. दरदिवशी सरासरी ५०० रुग्ण याप्रमाणे महिन्याला १५ हजार रुग्ण तपासणी व उपचार घेत हाेते. यामुळे जिल्हा रुग्णालयात गर्दी सुध्दा उसळत हाेती.

जानेवारी २०२० मध्ये १६ हजार १२९, फेब्रुवारी महिन्यात १७ हजार ५६२ रुग्णांनी उपचार घेतला आहे. मार्च महिन्यापासून काेराेनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने लाॅकडाऊन जाहीर केले. त्यामुळे ओपीडीत उपचार घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सर्दी, खाेकला, ताप असलेल्या व्यक्तीची सर्वप्रथम काेराेना तपासणी केली जात असल्याने ग्रामीण भागातील नागरिक बाह्यरूग्ण विभागात उपचार घेण्यास तयार हाेत नव्हते. त्यामुळे ओपीडीतील रुग्णांची संख्या घटण्यास सुरुवात झाली. जिल्ह्यात आता काेराेनाची साथ आटाेक्यात आली आहे. तरीही सर्दी, खाेकला, ताप असलेल्या रुग्णांना सर्वप्रथम काेराेना तपासणी करण्याचा सल्ला डाॅक्टर देत असल्याने रुग्ण अजूनही ओपीडीत उपचार घेण्यास धजावत नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच रुग्णसंख्या निम्म्यावर आहे. आंतररूग्ण विभागात मात्र पूर्वीप्रमाणेच महिन्याला जवळपास २ हजार २०० रुग्ण उपचार घेत आहेत.

बाॅक्स

खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यास प्राधान्य

जिल्हा रूग्णालयात सर्दी, ताप व खाेकल्याच्या रुग्णाला सर्वप्रथम काेराेनाची टेस्ट करण्याचा सल्ला दिला जात असल्याने काही रूग्ण जिल्हा रूग्णालयात न जाता खासगी डाॅक्टरांकडे उपचार घेण्यास पसंती दर्शवितात. ग्रामीण भागातील रुग्ण जिल्हा रूग्णालयात न येता स्थानिक स्तरावरील प्राथमिक आराेग्य केंद्रातही उपचार घेत आहेत.

Web Title: The number of OPD patients has halved