शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
2
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
3
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
4
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
5
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
6
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
7
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
8
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
9
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
10
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
11
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
12
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
13
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
14
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
15
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
16
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
17
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
18
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
19
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
20
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर

नवीन निकषाचा लहान शाळांना अनुदानात फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 6:00 AM

जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी, शाळेची स्वच्छता, थोडीफार दुरूस्ती व इतर किरकोळ खर्च करावा लागतो. शाळेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन राहत नाही. त्यामुळे शासनाकडून या शाळा अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारावर शाळा अनुदान दिले जाते.

ठळक मुद्देअर्धेच अनुदान मिळणार : जास्त पटसंख्येच्या शाळांना लाभ

दिगांबर जवादे।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : शाळेची देखभाल व किरकोळ खर्चासाठी सर्व शिक्षा अभियान मार्फत अनुदान मंजूर केले जाते. यावर्षी निकषांमध्ये बदल केल्याने याचा फटका कमी पटसंख्येच्या ९५८ शाळांना बसला आहे. या शाळांना मागील वर्षी प्रत्येकी दहा हजार रुपयांचे अनुदान मिळाले होते. यावर्षी केवळ पाच हजार रुपये अनुदान मिळाले आहे. मोठ्या शाळांना मात्र नवीन निकषाचा लाभ झाला आहे.जिल्हा परिषद शाळेला रंगरंगोटी, शाळेची स्वच्छता, थोडीफार दुरूस्ती व इतर किरकोळ खर्च करावा लागतो. शाळेकडे कोणतेही उत्पन्नाचे साधन राहत नाही. त्यामुळे शासनाकडून या शाळा अनुदान दिले जाते. पटसंख्येच्या आधारावर शाळा अनुदान दिले जाते. मागील वर्षीपर्यंत १ ते १०० पटसंख्येच्या शाळेसाठी १० हजार रुपये, १०१ ते २५० पटसंख्येच्या शाळेसाठी १५ हजार रुपये, २५१ ते १००० पटसंख्येच्या शाळेसाठी २० हजार रुपये, १००० पटसंख्येपेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळेसाठी २५ हजार रुपये अनुदान दिले जात होते. या नियमाचा गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळांना लाभ मिळत होता. जवळपास सर्वच शाळांना १० हजार रुपये अनुदान मिळत होते. यावर्षी मात्र शासनाने विद्यार्थी पटसंख्येचे निकष बदलविले आहेत. त्यामध्ये १ ते ३० पटसंख्येसाठी पाच हजार रुपये, ३१ ते ६० पटसंख्येसाठी १० हजार, ६१ ते १०० पटसंख्येसाठी २५ हजार, १०१ ते २५० पटसंख्येसाठी ५० हजार, २५१ ते १००० पटसंख्या असलेल्या शाळेसाठी ७५ हजार रुपये अनुदान दिले जाते. या नवीन निकषांमुळे कमी १ ते ३० च्या दरम्यान पटसंख्या असलेल्या शाळांचा तोटा झाला आहे. मात्र ६१ पेक्षा अधिक पटसंख्या असलेल्या शाळांना अधिकचे अनुदान मिळत आहे.९५८ शाळांचे अनुदान घटलेगडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश शाळा ग्रामीण व दुर्गम भागात आहेत. या भागात लोकसंख्या विरळ आहे. त्यामुळे पटसंख्या सुध्दा कमी आहे. १ ते ३० पर्यंत पटसंख्या असलेल्या सुमारे ९५८ शाळा आहेत. या शाळांना यावर्षी केवळ पाच हजार रुपये अनुदान देण्यात आले आहे. मागील वर्षी या शाळांना १० हजार रुपये अनुदान मिळाले होते. नवीन निकषामध्ये सर्वाधिक फटका १ ते ३० पर्यंतची पटसंख्या असलेल्या शाळांना बसला आहे. ३० पेक्षा अधिक पटसंख्या असल्यास त्या शाळांना मात्र अधिकचे अनुदान मिळत आहे. केवळ पाच हजार रुपये अनुदानातून शाळेचा वर्षभराचा खर्च कसा करावा, असा प्रश्न शिक्षक, मुख्याध्यापकांसमोर निर्माण झाला आहे.खर्च भागविणे कठीणजिल्हा परिषद शाळांना उत्पन्नाचे कोणतेही साधन उपलब्ध राहत नाही. मात्र शाळेचा वर्षभराचा खर्च भागवावा लागतो. त्यामुळे शासनाकडून १ ते ८ पर्यंत वर्ग असलेल्या नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या शाळांना अनुदान मिळते. कमी अनुदाना खर्च भागविताना कसरत होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा