झिंगानूर परिसरात आढळले नक्षली बॅनर

By Admin | Updated: July 24, 2015 01:35 IST2015-07-24T01:35:41+5:302015-07-24T01:35:41+5:30

सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर गावातील चौकामध्ये २३ जुलैच्या सकाळी नक्षली बॅनर व पत्रके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

Naxal banner found in Xinganoor area | झिंगानूर परिसरात आढळले नक्षली बॅनर

झिंगानूर परिसरात आढळले नक्षली बॅनर

गडचिरोली : सिरोंचा तालुक्याच्या झिंगानूर गावातील चौकामध्ये २३ जुलैच्या सकाळी नक्षली बॅनर व पत्रके आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नक्षलवाद्यांच्या या पत्रकामध्ये २८ जुलै ते ३ आॅगस्ट या काळात शहीद सप्ताह साजरा करण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.
या काळात लाल झेंडे उभारून शहीदांचे स्वप्न साकार करण्यासाठी निरंतर संघर्ष करा, असा आवाहन माओवादी संघटनेने केले आहे. या फलकावर भाकपा माओवादी सिरोंचा एरिया कमिटी असा उल्लेख करण्यात आला आहे. जिल्ह्यात दुर्गम व अतिदुर्गम भागात शहीद सप्ताहानिमित्त माओवाद्यांमार्फत बॅनर व पत्रके लावले जात आहे. चामोर्शी तालुक्याच्या रेगडी भागातही बुधवारी माओवाद्यांचे बॅनर रस्त्यावर लावलेले दिसून आले. पोलिसांनीही माओवाद्यांचा शहीद सप्ताह साजरा होत असल्यामुळे प्रतिउत्तरादाखल शांतीयात्रांचा कार्यक्रम आयोजित केला आहे. दरवर्षीच पोलीस प्रशासन अशा कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Naxal banner found in Xinganoor area