शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ लैंगिक शोषण प्रकरणात आणखी तीन संशयित व्यक्तीचे नाव पुढे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:45 IST

घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही ...

घरकाम करणाऱ्या आदिवासी अल्पवयीन मुलीच्या असहायतेचा फायदा घेत तिच्याशी आरोपींनी लैंगिक संबंध प्रस्थापित केले. त्यामुळे ती गर्भवती राहिली. ही बाब वैद्यकीय चाचणीनंतर लक्षात आल्याने व प्रसार माध्यमातून हे प्रकरण गाजल्याने शासनाच्या वतीने कोरची पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात २३ ऑगस्ट २०२० ला भादंवि कलम ३७६ (२)(जे) तसेच पोस्को कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

याप्रकरणात आरोपी म्हणून किरण अग्रवाल या व्यावसायिकाला ऑगस्ट २०२० मध्येच अटक झाली होती. पण डीएनए चाचणीचा रिपोर्ट जुळत नसल्याने पोलीसही चक्रावून गेले. त्यामुळे तपासाची चक्रे पुन्हा सुरू झाली. दरम्यान या प्रकरणातील पीडित युवतीने आणखी तीन संशयित व्यक्तींची नावे पोलिसांजवळ घेतली. त्यामुळे त्या तिघांपैकी बाळाचा खरा बाप कोण असावा, याबद्दल नागरिकांमध्ये विविध चर्चेला उधाण आले आहे. आता त्या तीन लोकांच्या डीएनए चाचणीनंतरच खर काय ते पुढे येणार आहे. त्या तीन संशयित लोकांना १७ फेब्रुवारीला कुरखेड़ाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा या प्रकरणाचे तपास अधिकारी जयदत्त भवर यांनी ताब्यात घेतले. एवढेच नाही तर त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फाॅरेन्सिक लॅबमध्ये पाठविले आहे.

एसडीपीओ भंवर यांना विचारले असता, या प्रकरणातील पीडितेने नाव घेतलेल्या तीन संशयित व्यक्तींची चौकशी करून त्यांचे डीएनए नमुने चाचणीसाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविले. त्यानंतर या तिघांना सूचनापत्र देऊन सोडल्याचे त्यांनी सांगितले. प्रकरणी अजून कोणकोण आरोपी समोर येतात आणि बाळाचा खरा बाप कोण? याचा शोध लावण्यात पोलीस यशस्वी होतात का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

(बॉक्स)

सर्वावरच गुन्हा दाखल होणार?

- हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पीडित युवतीने एका व्यावसायिकाचे नाव घेतले. तो एकमेव आरोपी आहे असे गृहित धरून पोलिसांनी कारवाई केली. मात्र डीएनए चाचणीच्या रिपोर्टनंतर पोलिसांनी पुन्हा युवतीला सखोल विचारपूस केली तेव्हा आणखी तीन जणांचे नावे पुढे आली. त्यामुळे पीडित युवतीचे शोषण एकापेक्षा जास्त आरोपींनी केल्याचे दिसून येत आहे.

- या प्रकरणात आता चार आरोपी झाले आहेत. त्यापैकी ज्याच्याशी डीएनए जुळेल तो मुख्य आरोपी असला तरी इतर लोकांवरही लैंगिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा कायम राहू शकतो. प्रत्यक्ष पीडित मुलीनेच त्यांची नावे घेतल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र तूर्त पोलिसांनी त्या तिघांवर गुन्हा दाखल केलेला नाही.