सुरजागडात रस्ता निर्मितीच्या कामाला आणखी सुरूवात

By Admin | Updated: August 17, 2016 01:35 IST2016-08-17T01:35:20+5:302016-08-17T01:35:20+5:30

दोन महिन्याच्या विश्रातीनंतर एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिजाचे उत्खनन करण्यासाठी

More work on road construction in Surajgarh | सुरजागडात रस्ता निर्मितीच्या कामाला आणखी सुरूवात

सुरजागडात रस्ता निर्मितीच्या कामाला आणखी सुरूवात

एटापल्ली : दोन महिन्याच्या विश्रातीनंतर एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरील लोहखनिजाचे उत्खनन करण्यासाठी मार्ग निर्मितीच्या कामाला पुन्हा सुरूवात झाली आहे. एटापल्ली येथील जनहितवादी युवा समिती मात्र दगड एटापल्ली तालुक्याच्या बाहेर नेऊ देण्यास विरोध दर्शविला असून याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या मार्फतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री, पालकमंत्री यांना १६ आॅगस्ट रोजी पाठविले आहे.
सुरजागड पहाडीवर मोठ्या प्रमाणात लोहखनिज आहे. या लोहखनिजाचे उत्खनन करून त्याची चंद्रपूर जिल्ह्यात वाहतूक करण्यात येण्यास दोन महिन्यापूर्वी सुरूवात झाली होती. याबाबीला जिल्हाभरातून तीव्र विरोध झाला होता. अनेक संघटनांनी आंदोलन उभारले होते. लोहप्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच उभारण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत होती. अन्यथा लोहखनिज बाहेर जिल्ह्यात नेऊ देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला होता. आंदोलनानंतर काही दिवस कंपनीने रस्ता निर्मिती व खोदकाम बंद केले होते. दोन महिन्यानंतर आता पुन्हा रस्ता निर्मितीच्या कामाला कंपनीने सुरूवात केली आहे. रस्ता निर्मितीचे काम अतिशय वेगाने व्हावे, यासाठी पोकलँड ही मशीन आणण्यात आली आहे. या मशीनच्या सहाय्याने पहाडाकडे जाणारा मार्ग सपाटीकरणाचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर या मार्गावर ट्रॅक्टर व ट्रकच्या सहाय्याने मुरूमही टाकले जात आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: More work on road construction in Surajgarh