खसोडा टोला येथे मोहसडवा केला नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:39 IST2021-02-09T04:39:07+5:302021-02-09T04:39:07+5:30

कोरची : तालुक्यातील खसोडा टोला येथील एका घरी मोहसडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमू व गावातील काही लोकांना ...

Mohsadwa destroyed at Khasoda Tola | खसोडा टोला येथे मोहसडवा केला नष्ट

खसोडा टोला येथे मोहसडवा केला नष्ट

कोरची : तालुक्यातील खसोडा टोला येथील एका घरी मोहसडवा टाकला असल्याची माहिती मुक्तिपथ तालुका चमू व गावातील काही लोकांना मिळाली. या माहितीवरून धाड टाकून दारूविक्रेत्याच्या हातानेच ५० किलो मोहसडवा नष्ट करण्यात आला. सोबतच पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी देण्यात आली. खसोडा गावात दारूविक्री पूर्णतः बंद आहे. मात्र नजीकच्या खसोडा टोला येथील काही लाेक दारूविक्री करीतच आहेत. गाव संघटनेच्या सदस्यांनी समज देऊनसुद्धा त्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला आहे. दरम्यान, मुक्तिपथ तालुका चमूला मोहसडवा टाकला असल्याची माहिती प्राप्त होताच घरी जाऊन विचारपूस केली. यावेळी घरात ५० किलो मोहसडवा आढळून आला. गावातील काही लोकांच्या उपस्थितीत संपूर्ण मोहसडवा दारूविक्रेत्याच्या हातानेच नष्ट करून पुन्हा दारू विक्री न करण्यास बजावले.

Web Title: Mohsadwa destroyed at Khasoda Tola