गणरायाला निरोप

By Admin | Updated: September 16, 2016 01:50 IST2016-09-16T01:50:50+5:302016-09-16T01:50:50+5:30

गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी शांततापूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळ व

Message to Ganaraya | गणरायाला निरोप

गणरायाला निरोप

गडचिरोली जिल्ह्यात गुरूवारी शांततापूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सार्वजनिक गणेश मंडळ व घरगुती गणपतींचे आज ११ व्या दिवशी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हाभरात विसर्जन करण्यात आले. भामरागड येथे लोकबिरादरी प्रकल्पात विराजमान झालेल्या गणरायाला पर्लकोटा नदीत विसर्जित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे व आमटे परिवारातील सर्व सदस्यांसह लोकबिरादरीचा परिवार उपस्थित होता. जिल्ह्याच्या सर्वच तालुक्यात विसर्जन रात्री उशीरापर्यंत सुरू होते. आरमोरी येथे अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी रामसागर तलावात गणेशमूर्तींचे विसर्जन केले. गडचिरोली शहरातही सायंकाळी ७ वाजता नंतर विसर्जन मिरवणुकांना सुरूवात झाली. यावेळी कार्यकर्ते डीजेच्या तालावर नाचत होते. रात्री उशिरापर्यंत शहरातील तलावात विसर्जन सुरूच होते.

Web Title: Message to Ganaraya