पोर्लात पार पडला कार्यकर्ता मेळावा

By Admin | Updated: December 28, 2016 03:06 IST2016-12-28T03:06:39+5:302016-12-28T03:06:39+5:30

वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी पोर्ला येथे पार पडला.

Meet the workers in the palace | पोर्लात पार पडला कार्यकर्ता मेळावा

पोर्लात पार पडला कार्यकर्ता मेळावा

बंडोपंत मल्लेलवार यांचे आवाहन : विकासाला सहकार्य करा
पोर्ला : वसा-पोर्ला जिल्हा परिषद क्षेत्रातील कार्यकर्त्यांचा मेळावा सोमवारी पोर्ला येथे पार पडला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार होते.
यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. राम मेश्राम, विलास दशमुखे, पुष्पकला जेंगठे, केशराव दशमुखे, मोरेश्वर रणदये, मुखरूजी चुधरी, रेखा खेडकर, परशुराम बांबोळे, नरेंद्र मामिडवार, काशिनाथ फरांडे, गजानन बारसागडे, मंगला भोयर, आनंदराव मोहुर्ले, बापूजी फरांडे, जीवन निकुरे, तुलाराम अंबादे, शंकर इंगळे, भगवान इंगळे, सुरेश रधये, फागोजी भोयर, दादाजी दशमुखे, अनिल शेडमाके, पुंडलिक, हिरामण उरकुडे, आनंदराव मडावी, रवी भैसारे, हेमंत सहारे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद क्षेत्रातून बंडोपंत मल्लेलवार, पोर्ला गणातून विलास दशमुखे, वसा गणात पुष्पकला जेंगठे यांच्या उमेदवारीची घोषणा कार्यकर्त्यांच्या साक्षीने करण्यात आली. विकासाला सहकार्य करण्याचे आवाहन मल्लेलवार यांनी उपस्थितांना केले. प्रास्ताविक नामदेव उंदीरवाडे, संचालन मुखरू साळवे तर आभार गावतुरे यांनी केले. (वार्ताहर)

Web Title: Meet the workers in the palace