शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड मताधिक्यांनी अनेक उमेदवारांचा विजय

By admin | Updated: February 25, 2017 01:18 IST

गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी

अनेकांचे मताधिक्य आश्चर्यकारक : रमाकांत ठेंगरी, जगन्नाथ बोरकुटे व मनिषा गावडे दोन आकड्यांवर विजयी गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. या निकालात अनेक उमेदवारांनी प्रचंड मताधिक्यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळविला आहे. केवळ जगन्नाथ बोरकुटे व रमाकांत ठेंगरी हे दोघेच अनुक्रमे ६६ व ८० मतांच्या फरकाने निवडून आले आहेत. इतर विजयी उमेदवारांचे मताधिक्य तीन अंकी आकड्यांचेच असल्याचे दिसून येत आहे. कोरची तालुक्यातून काँग्रेसने दोन जागा जिंकल्या. अनिल केरामी १२० तर सुमित्रा लोहंबरे २४५ मतांनी विजयी झाले. कुरखेडा तालुक्यात काँग्रेसचे प्रभाकर तुलावी २३१, भाजपचे नाजुकराव पुराम १४९, काँग्रेसचे प्रल्हाद कराडे ३८१, भाजपचे भाग्यवान टेकाम १ हजार ५८९ मतांनी निवडून आले आहेत. तर भाजपच्या गीता कुमरे ४१० मतांनी निवडून आल्या. देसाईगंज तालुक्यात रमाकांत ठेंगरी यांनी परसराम टिकले यांचा ८० मतांनी पराभव केला. तर नाना नाकाडे यांनी जीवन नाट यांचा १ हजार ५८ मतांनी पराभव केला. भाजपच्या रोशनी पारधी ४४९ मतांनी निवडून आल्या. आरमोरी तालुक्यात वैरागड-मानापूरवरून भाजपचे संपत आळे १ हजार ५ मतांनी निवडून आले आहे. तर काँग्रेसच्या मनिषा दोनाडकर यांनी शिवसेनेच्या लक्ष्मी मने यांचा ५१३ मतांनी पराभव केला आहे. ठाणेगाव-इंजेवारीतून भाजपच्या मितलेश्वरी खोब्रागडे या तब्बल १ हजार २५ मतांनी निवडून आल्या आहेत. तर काँग्रेसच्या वनिता सहाकाटे ५४२ मतांनी निवडून आल्या आहेत. धानोरा तालुक्यातून भाजपच्या लता पुंगाटी १ हजार १२३, काँग्रेसचे मनोहर पोरेटी १ हजार ३८६, काँग्रेसचे अजिज जीवानी ५६९, काँग्रेसचे श्रीनिवास दुलमवार ७२२ मतांनी निवडून आले आहेत. गडचिरोली तालुक्यातून भाजपच्या निता साखरे ७६४, राकाँचे जगन्नाथ बोरकुटे ६६, रासपच्या वर्षा कौशीक ७२८, काँग्रेसचे अ‍ॅड. राम मेश्राम २५१ तर जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी काँग्रेसच्या वैशाली ताटपल्लीवार तब्बल २ हजार ४७५ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी भाजपच्या रेखाताई डोळस व शिवसेनेच्या छाया कुंभारे यांचा पराभव केला आहे. चामोर्शी तालुक्यातून भाजपचे रमेश बारसागडे १ हजार ३१०, भाजपच्या योगीता भांडेकर १ हजार ४४४, भाजपच्या विद्या आभारे २ हजार ३१९, काँग्रेसच्या कविता भगत १ हजार २३६, ज्येष्ठ नेते अतुल गण्यारपवार १ हजार ६१४, भाजपच्या रंजीता कोडापे ६६५, भाजपचे नामदेवराव सोनटक्के १ हजार ७९, भाजपच्या शिल्पा रॉय २ हजार ४२, काँग्रेसच्या रूपाली पंदीलवार २२३ मतांनी विजयी झाल्या आहेत. मुलचेरा तालुक्यातून राकाँचे युध्दिष्ठीर बिश्वास ४९२, काँग्रेसचे रविंद्र शहा ५५७, भाजपच्या माधुरी उरते ३१४ मतांनी विजयी झाल्या आहेत. उरते यांनी माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या कन्या तनुश्री आत्राम यांचा पराभव केला आहे. एटापल्ली तालुक्यातून काँग्रेसचे संजय चरडुके ३०२, भाजपच्या कल्पना आत्राम १७३ तर ज्येष्ठ नेते सैनू मासू गोटा ५५९ मतांनी विजयी झाले आहेत. आदिवासी विद्यार्थी संघाच्या सारीका आईलवार २४१ मतांनी निवडून आल्या आहेत. भामरागड तालुक्यातून अ‍ॅड. लालसू सोमा नरोटे ४१६ मतांनी निवडून आल्या. तर ग्यानकुमारी टांगरू कौशी या ११३ मतांनी निवडून आल्या. अहेरी तालुक्यातून आविसंच्या सुनिता कुसनाके २७४, आविसंचे अजय कंकडालवार २ हजार ११३ मतांनी निवडून आले आहेत. कंकडालवार यांचे मताधिक्य जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे आहे. २०१२ मध्ये ते जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी निवडून आले होते. माजी आमदार दीपक आत्राम यांच्या पत्नी अनिता आत्राम १०२ मतांनी निवडून आल्या आहेत. त्यांनी नेहा रवींद्र आत्राम यांचा पराभव केला. पेरमिली-राजाराम क्षेत्रातून भाजपच्या मनिषा गावडे ८९ मतांनी विजयी झाल्या. तर आविसंचे अजय नैताम ४३६ मतांनी विजयी झाल्या आहेत. राकाँचे ऋषी पोरतेट १ हजार ६३० निवडून आले आहेत. सिरोंचा तालुक्यात आविसंच्या सरिता तैनेनी ४१६ मतांनी निवडून आल्या आहेत. तर माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री धर्मरावबाबा आत्राम ८७३ मतांनी निवडून आल्या आहेत. आविसंच्या जयसुधा जनगाम ६९५ मतांनी निवडून आल्या आहेत. भाजपच्या श्रीदेवी पांडवला या लक्ष्मीदेवीपेठा अंकिसा जि.प. क्षेत्रातून ३०८ मतांनी निवडून आल्या आहते. जिल्ह्यात जगन्नाथ बोरकुटे, रमाकांत ठेंगरी व मनिषा गावडे हे तीन उमेदवार केवळ दुहेरी आकड्यात निवडून आलेत. बाकी सर्व उमेदवार शंभरीच्या पार मताधिक्यांनी निवडून आले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)