मार्कंडादेवची यात्रा रद्द, विधिवत पूजा हाेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:34 IST2021-03-08T04:34:01+5:302021-03-08T04:34:01+5:30

मार्कंडादेव येथील मंदिर दि. १० ते २० मार्च २०२१ पर्यंत भाविकांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. ७ मार्च रोजी गंगापूजन ...

Markandadev's yatra canceled, pooja will be performed properly | मार्कंडादेवची यात्रा रद्द, विधिवत पूजा हाेणार

मार्कंडादेवची यात्रा रद्द, विधिवत पूजा हाेणार

मार्कंडादेव येथील मंदिर दि. १० ते २० मार्च २०२१ पर्यंत भाविकांसाठी पूर्णत: बंद राहणार आहे. ७ मार्च रोजी गंगापूजन व पैजा अभिषेक, ११ मार्च रोजी धार्मिक परंपरेनुसार पहाटे साडेचार वाजता महापूजा होणार आहे. १२ मार्च रोजी टिपूर पूजा हाेईल. १४ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता समारोपीय महापूजा होणार आहे. तरी कोविड-१९ च्या शासनाच्या अटी व शर्तीचे पालन करून मार्कंडादेव येथे दिनांक १० ते २० मार्चपर्यंत परंपरेनुसार धार्मिक महापूजा सकाळी व सायंकाळी करण्यात येईल. भाविकांसाठी मंदिर पूर्णतः बंद असल्याने या कालावधीत मार्कंडादेव येथे येऊ नये असे आवाहन श्री मार्कंडेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर, सचिव मृत्युंजय गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: Markandadev's yatra canceled, pooja will be performed properly