मनुष्यबळातूनच विकास शक्य

By Admin | Updated: July 16, 2015 02:00 IST2015-07-16T02:00:41+5:302015-07-16T02:00:41+5:30

देशातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक युवकाने कौशल्य आत्मसात केल्याशिवाय रोजगार प्राप्ती अशक्य आहे.

Manpower is possible only through development | मनुष्यबळातूनच विकास शक्य

मनुष्यबळातूनच विकास शक्य

अशोक नेते यांचे प्रतिपादन : जागतिक युवा कौशल्य दिन कार्यक्रम
आरमोरी : देशातील प्रत्येक युवकाच्या हाताला काम मिळणे गरजेचे आहे. प्रत्येक युवकाने कौशल्य आत्मसात केल्याशिवाय रोजगार प्राप्ती अशक्य आहे. देशाच्या आर्थिक विकासासाठी रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे कौशल्यपूर्ण योग्य मनुष्यबळातूनच देशाचा व जिल्ह्याचा विकास शक्य आहे, असे प्रतिपादन खा. अशोक नेते यांनी केले.
स्थानिक महात्मा गांधी महाविद्यालय नेहरू युवा केंद्र गडचिरोलीच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी महाविद्यालयातील क्रीडा संकुलात बुधवारी जागतिक कौशल्य दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष किशोर वनमाळी, तहसीलदार वलथरे, पोलीस निरिक्षक बच्चलवार, बाबजी, जमुनाद दगावकर, भाजपाचे पदाधिकारी डॉ. भारत खटी, विजय बालपांडे, अखिलेश मेश्राम, सुदर्शन, प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, मुख्याध्यापक साईनाथ अद्दलवार, प्रा. डॉ. तामगाडे, अमोल काळबांधे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. लालसिंग खालसा, संचालन प्रा. नोमेश मेश्राम यांनी तर आभार अखिलेश मिश्रा यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Manpower is possible only through development