शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
4
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
5
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
6
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
7
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
8
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
9
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
10
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
11
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
12
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
13
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
14
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
15
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
16
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
17
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
18
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
19
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

यात्रेसाठी योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2016 01:50 IST

विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून यात्रा प्रारंभ होणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : मार्कंड्यात झाली आढावा बैठकचामोर्शी : विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त ७ मार्चपासून यात्रा प्रारंभ होणार आहे. १० दिवस चालणाऱ्या या यात्रेसाठी प्रशासनाच्या सर्व विभागांनी योग्य नियोजन करून भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावे, असे निर्देश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिले. मार्र्कंडादेव येथे गुरूवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला मार्कंडा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गजाननराव भांडेकर उपाध्यक्ष मनोज पालारपवार, माजी खासदार मारोतराव कोवासे, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे आदी उपस्थित होते. यावेळी पंचायत समिती, ग्रामपंचायत मार्कंडा, जि.प. बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन मंडळ, आरोग्य विभाग, महावितरण कंपनी, आपत्ती व्यवस्थापन केंद्र वन विभाग, पोलीस विभाग यांच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी योग्य त्या सूचना दिल्या. यात्रा काळात भाविकांची गैरसोय होणार यासाठी विशेष व्यवस्था करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. विदर्भाच्या विविध भागासह चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातूनही भाविक मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे बसगाड्यांची व्यवस्था तसेच फिरत्या मोबाईल शौचालयाची व्यवस्था ठेवण्याचेही निर्देश देण्यात आले.