शहरं
Join us  
Trending Stories
1
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
2
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
3
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
4
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
5
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
6
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
7
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
8
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
9
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
10
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
11
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
12
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
13
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
14
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
15
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
16
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
17
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
18
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
19
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सीईओंनी ठोकले बाल विकास कार्यालयाला कुलूप

By admin | Updated: November 6, 2016 01:30 IST

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता,

भामरागडला आकस्मिक भेट : अधिकारी व कर्मचारी गैरहजर; विकासकामांचा आढावाभामरागड : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी भामरागड पंचायत समितीला शनिवारी आकस्मिक भेट दिली असता, भेटीदरम्यान एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या गोयल यांनी या कार्यालयास कुलूप ठोकले. आपले आदेश प्राप्त झाल्याशिवाय कुलूप उघडण्यास मनाईसुद्धा केली. गोयल यांच्या या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ निर्माण झाली आहे.सीईओ गोयल यांनी शनिवारी भामरागड तालुक्याचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान पंचायत समिती भामरागड येथे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवकांकडून विकास कामांचा आढावा घेतला. आढावा सभेदरम्यान मार्च २०१७ अखेर गृहकर, पाणीकराची वसुली १०० टक्के करण्यात यावी, घरकूल व शौचालय बांधकामाचेही उद्दिष्ट १०० टक्के गाठावे, असे निर्देश दिले. या बैठकीला एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयातील एकही अधिकारी व कर्मचारी उपस्थित नसल्याने गोयल यांनी या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत अधिकची माहिती जाणून घेतली असता, एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले. कार्यालयाला कुलूप ठोकल्यानंतर येथील कर्मचारी व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. भामरागड पंचायत समितीचे सभापती रंजना दिलीप उईके, पंचायत समिती सदस्य जे. डी. भांडेकर या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. चर्चेदरम्यान सभापती उईके यांनी भामरागड तालुक्यातील बंद असलेल्या अंगणवाडी केंद्रांचा पाढा वाचला व यासाठी जबाबदार असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली. त्यानंतर गोयल यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र लाहेरीला भेट दिली. या भेटीदरम्यान डॉ. मिलींद मेश्राम हजर होते. संपूर्ण दवाखान्याची पाहणी करून आरोग्य सेवेचे कौतुक केले. त्यानंतर अंगणवाडी केंद्र लाहेरीला भेट दिली. अंगणवाडी केंद्र नियमित सुरू राहत असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली. संपूर्ण दौरा आटोपून परत जात असताना दर महिन्याला भामरागड पंचायत समितीला आकस्मिक भेट दिली जाईल, या भेटीदरम्यान जे अधिकारी व कर्मचारी गैरहजर आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा सीईओ शांतनू गोयल यांनी दिला. (तालुका प्रतिनिधी)