अंकिसात प्रवाशी निवाऱ्याचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:30 IST2021-01-09T04:30:37+5:302021-01-09T04:30:37+5:30

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशांना मंदिरात राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथे प्रवाशी ...

Lack of passenger shelter in Ankisa | अंकिसात प्रवाशी निवाऱ्याचा अभाव

अंकिसात प्रवाशी निवाऱ्याचा अभाव

अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे प्रवाशी निवारा नसल्याने प्रवाशांना मंदिरात राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथे प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

ऊन, वारा, थंडी, पाऊस यापासून प्रवाशांचे संरक्षण व्हावे, यासाठी शासनाच्या वतीने बस तिथे प्रवाशी निवारा ही संकल्पना राबवून ठिकठिकाणी प्रवाशी निवाऱ्याचे बांधकाम केले. अंकिसा गावाला तालुक्यातील महत्त्वपूर्ण ठिकाण म्हणून ओळखले जाते. परंतु महत्त्वाच्या गावातच प्रवाशी निवारा नाही. सिरोंचा ते पातागुडम या मार्गावर प्रवाशी वाहनांची मोठी वर्दळ असते. या वाहनांद्वारे नागरिक प्रवास करीत असतात. अंकिसा येथे अनेक गावचे प्रवाशी थांबतात. परंतु त्यांना झाडे, दुसऱ्याची घरे तसेच मंदिराचा आश्रय घ्यावा लागतो. त्यामुळे येथे प्रवाशी निवाऱ्याची गरज आहे.

Web Title: Lack of passenger shelter in Ankisa