राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 11:22 AM2021-01-16T11:22:06+5:302021-01-16T11:22:36+5:30

Gadchiroli News सिराेंचा तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्यांचा अभाव आहे. शासकीय व खासगी नाेकऱ्याही नाहीत. त्यामुळे या भागातील सुशिक्षित युवक व अल्प शिक्षित मजूर राेजगारासाठी तेलंगणा राज्यात धाव घेत आहेत.

Laborers rush to Telangana for employment | राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव

राेजगारासाठी मजुरांची तेलंगणाकडे धाव

Next
ठळक मुद्देराेहयाेची कामे बंद असल्याचा परिणाम

काैसर खान

लाेकमत न्यूज नेटवर्क

गडचिराेली : सिराेंचा तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यात उद्याेगधंद्यांचा अभाव आहे. शासकीय व खासगी नाेकऱ्याही नाहीत. त्यामुळे या भागातील सुशिक्षित युवक व अल्प शिक्षित मजूर राेजगारासाठी तेलंगणा राज्यात धाव घेत आहेत. राेजगार हमी याेजनेची कामे बंद असल्याने स्थलांतर करणाऱ्या मजुरांची संख्या वाढली असल्याचे बाेलले जात आहे.

ब्रिटिश काळात सिराेंचा तालुक्याला प्रचंड महत्त्व हाेते. सिराेंचा तालुका नदी, नाले, जंगल व इतर नैसर्गिक साधनसंपत्तीने नटलेला आहे. बारमाही वाहणाऱ्या नद्या असून, येथे सिंचन सुविधा ताेकडी आहे. उद्याेगासाठी सर्व गाेष्टी उपलब्ध असतानासुद्धा शासनाच्या उदासीन धाेरणामुळे तालुक्यात माेठे उद्याेग स्थापन हाेऊ शकले नाही. परिणामी तालुक्यासह गडचिराेली जिल्ह्यातील मजूर वर्ग दरवर्षी, मिरची व साेयाबीन ताेडण्याच्या कामासाठी माेठ्या संख्येने तेलंगणात जात असतात.

चामाेर्शी तालुका मुख्यालयापासून १२ कि.मी. अंतरावर असलेल्या कुनघाडा रै. येथील २० मजुरांचा जत्था वाहनाने तेलंगणाकडे जात हाेता. तेलंगणातील कंत्राटदाराने पाठविलेले वाहन सिराेंचापासून २५ कि.मी. अंतरावर कंबालपेठा गावानजीक पंक्चर झाले. दरम्यान, राेमपल्ली-कंबालपेठा दरम्यानच्या जंगलात मजूर अडकून पडले. काेराेनामुळे शाळा बंद असल्यामुळे मुला, मुलींसह गावातील लाेक राेजगारासाठी तेलंगणात जात असल्याचे दिसून येत आहे.

तीन वर्षांपासून कामासाठी स्थलांतर

चामाेर्शी तालुक्याच्या कुनघाडा (रै.) परिसरात शेती आहे. भरपूर शेती असणारे, तसेच नाेकरी असणारे लाेक साेडले तर इतर सर्वजण राेजगारासाठी जिल्ह्याबाहेर जातात. आमच्या परिसरात राेजगार हमीची कामे नसल्याने आम्हाला जिल्ह्याबाहेर कामासाठी जावे लागते. गेल्या तीन वर्षांपासून सतत घर साेडून लहान मुला, मुलींसाेबत तेलंगणात मिरची ताेडण्याच्या कामासाठी जात आहाेत, असे मजूर दिलीप काेसमशिले यांनी सांगितले.

Web Title: Laborers rush to Telangana for employment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.