शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

श्रमदानातून पुलालगतचा रस्ता बांधला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 06:00 IST

मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे. मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे.

ठळक मुद्देराजोलीवासीयांचा पुढाकार : दरवर्षी पावसाळ्यात वाहून जातो रस्ता; कायमस्वरूपी समस्या सोडवा

लोकमत न्यूज नेटवर्कधानोरा : तालुक्यातील राजोली नदीवर बांधण्यात आलेल्या पुलाजवळचा रस्ता वाहून गेला. नागरिकांनी श्रमदानातून पुलापर्यंत रस्ता बांधला.राजोली गावाला जाताना पडत असलेल्या नदीवर नागरिकांच्या मागणीनंतर शासनाने पूल बांधला. मात्र पुलाचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. काही दिवसांतच पुलाच्या बाजूची माती वाहून गेली. नदीचा विस्तार झाल्याने नदीच्या किनारा व पूल यांच्यामध्ये काही अंतर पडले. पुलाजवळचा भाग नदीत रूपांतर झाला आहे. त्यामुळे आता दरवर्षी पावसाळ्यात सदर पूल निकामी होते. पलिकडे जायचे असेल तर सर्वप्रथम नदीचे पाणी ओलांडावे लागते. त्यानंतर पूल येतो. मात्र उंच पुलावर चढणे अशक्य होते. पावसाळा संपल्यानंतर या मार्गावरून वाहतूक करणे शक्य होते. मात्र पुलाला जोडणारा रस्ता तयार करावा लागतो. दरवर्षीची ही समस्या आहे. प्रशासनाचे अधिकारी लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी श्रमदानातून पुलापर्यंतचा रस्ता तयार केला. या रस्त्यावरून आता वाहतूक सुरू झाली आहे.मात्र गावकऱ्यांनी तयार केलेला रस्ता पावसाळ्यापर्यंतच राहणार आहे. पावसाळ्यामध्ये नदीला पाणी आल्यानंतर सदर मार्ग नदीत वाहून जाते. या पुलाची ही दरवर्षीची समस्या बनली आहे. त्यामुळे पुलाचा विस्तार करणे आवश्यक आहे.मुख्य मार्गापासून राजोलीपर्यंतचा मार्ग मार्च २०१८ मध्ये बांधण्यात आला होता. या मार्गाची देखभाल व दुरूस्ती करण्याची जबाबदारी २०२३ पर्यंत संबंधित ठेकेदाराची आहे. त्याकरिता निधी सुद्धा वाढवून दिला. मात्र या मार्गाची डागडुजी केली नाही. परिसरातील शेतकरी आता धान्य व इतर साहित्य धानोरा येथे आणत आहेत तसेच शालेय विद्यार्थी व इतर नागरिकांचीही या मार्गाने वर्दळ राहते.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असल्याने नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. डांबर पूर्णपणे उखडून गेला आहे. रस्त्यावरची गिट्टी बाहेर निघाली आहे.तालुक्यातील इतरही मार्गांची दुरवस्थायावर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील बहुतांश डांबरी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक कमालीचे त्रस्त आहेत. पावसाळा संपला असल्याने आता बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा या मार्गावरून वाहतूक करणे उन्हाळ्यापर्यंत अशक्य होणार आहे. गावांमधील अंतर्गत रस्त्यांचीही वाट लागली असल्याचे दिसून येते.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक