शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कुरखेड्यात सामाजिक कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला

By admin | Updated: June 24, 2016 01:56 IST

येथील राणा प्रताप वार्डातील आपल्या घराच्या वऱ्हांड्यात झोपलेल्या वृध्द आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना ...

कुरखेडा : येथील राणा प्रताप वार्डातील आपल्या घराच्या वऱ्हांड्यात झोपलेल्या वृध्द आदिवासी सामाजिक कार्यकर्त्यावर अज्ञात इसमाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मंगळवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली. आदिवासी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कंगला माझी संघटनेचे सदस्य सिताराम रावजी तुलावी (८०) हे घरी वऱ्हांड्यात एकटेच झोपले असताना अज्ञात इसमाने मोठा दगड त्यांच्याडोक्यावर मारला. त्यानंतर तो तेथून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच काँग्रेस कार्यकर्ते धनराज लाकडे, मनोज कोरेटी, साजन हारामी, जगदिश पोरेटी, पुरूषोत्तम तुलावी यांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी असलेल्या तुलावी यांना उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यांची परिस्थिती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविण्यात आले. या घटनेचा पंचनामा कुरखेडा पोलिसांनी केला असून अज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (तालुका प्रतिनिधी)