तंबाखूमुक्त शाळा अभियान व्यापक प्रमाणात राबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:04+5:302021-02-05T08:49:04+5:30

गडचिराेली : तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची मागणी देसाईगंज येथील आराेग्य प्रबाेधिनी संस्थेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे ...

Implement a tobacco-free school campaign on a large scale | तंबाखूमुक्त शाळा अभियान व्यापक प्रमाणात राबवा

तंबाखूमुक्त शाळा अभियान व्यापक प्रमाणात राबवा

गडचिराेली : तंबाखूमुक्त शाळा हा उपक्रम व्यापक प्रमाणात राबविण्याची मागणी देसाईगंज येथील आराेग्य प्रबाेधिनी संस्थेच्या वतीने पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली.

गडचिराेली जिल्ह्यात तंबाखूमुक्त शाळा उपक्रम राबविला जात आहे; परंतु अनेक ठिकाणी या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी हाेत नसल्याचे दिसून येते. निराेगी व व्यसनमुक्त विद्यार्थी, तसेच शिक्षक व परिसरासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियान व्यापक प्रमाणात राबवावे, अशी मागणी प्रबाेधिनीचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश गभने यांनी पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली. तंबाखूमुक्त शैक्षणिक संस्थेचे नऊ निकष असलेले निवेदन गभने यांनी पालकमंत्र्यांना दिले. याप्रसंगी पालकमंत्र्यांसाेबत आ. धर्मरावबाबा अत्राम, आ. कृष्णा गजबे, आ. डॉ. देवराव होळी, आ. ॲड. अभिजित वंजारी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्र्यांनी आरोग्य प्रबोधिनीच्या तंबाखूमुक्त उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. शिक्षण आणि आरोग्य विभागाला याबाबत निर्देश देणार असल्याचे सांगितले.

Web Title: Implement a tobacco-free school campaign on a large scale