शहीद जवानाच्या कुटुंबाला ध्वजारोहण करण्याचा मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:09+5:302021-02-05T08:49:09+5:30

मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील पोलीस चौकीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण डांगे ...

Honor to the family of the martyred soldier | शहीद जवानाच्या कुटुंबाला ध्वजारोहण करण्याचा मान

शहीद जवानाच्या कुटुंबाला ध्वजारोहण करण्याचा मान

मुलचेरा : तालुक्यातील लगाम येथील पोलीस चौकीमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी अहेरी पोलीस स्टेशनचे निरीक्षक प्रवीण डांगे यांनी ध्वजारोहणाचा मान शहीद अजय मास्टे यांचे वडील अशोक मास्टे यांना दिला. अजय मास्टे हे २००६ मध्ये पोलीस दलात भरती झाले हाेते. त्यानंतर २६ ऑक्टाेबर २००८ मध्ये अहेरी तालुक्यातील कोरेपल्ली येथे झालेल्या नक्षल चकमकीत ते शहीद झाले. पोलीस निरीक्षक प्रवीण डांगे हे अहेरी पोलीस स्टेशनमध्ये १० ऑगस्ट २०१९ रोजी रूजू झाल्यापासून ते मुलचेरा तालुक्यातील लगाम पोलीस चौकी येथील ध्वजारोहण स्वत: न करता ध्वजारोहणाचा मान ज्येष्ठ

नागरिक व शहीद कुटुंबातील सदस्यांना देत आहेत. मात्र लगाम परिसरात पहिल्यांदाच एका पोलीस निरीक्षकाने शहीद कुटुंबाला ध्वजारोहणाचा मान दिल्याने डांगे यांची प्रशंसा केली जात आहे. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब शिंदे, महिला पोलीस उपनिरीक्षक रुपाली काळे, आसावरी शेळके, पोलीस पाटील गिरमा मडावी, माजी सरपंच मनीष मारटकर तसेच नागरिक व कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Honor to the family of the martyred soldier