दारिद्र्य रेषेखालील मृतकांच्या कुटुंबीयांना मदत देणार

By Admin | Updated: September 1, 2016 01:44 IST2016-09-01T01:44:37+5:302016-09-01T01:44:37+5:30

येथील प्रतिष्ठीत व्यावसायिक तथा समाजसेवक पवन गिरडकर यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखाद्या

Helping the families of the dead line below | दारिद्र्य रेषेखालील मृतकांच्या कुटुंबीयांना मदत देणार

दारिद्र्य रेषेखालील मृतकांच्या कुटुंबीयांना मदत देणार

गिरडकर कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम
गडचिरोली : येथील प्रतिष्ठीत व्यावसायिक तथा समाजसेवक पवन गिरडकर यांनी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अंतिम संस्काराकरिता मदत देण्याचा मनोदय व्यक्त केला आहे.
दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या अंतिम संस्काराकरिता आर्थिक अडचणींचा सामना कुटुंबाला करावा लागतो. त्यांना मदतीचा हात म्हणून वडील स्व. शंकररावजी गिरडकर तथा बंधू स्व. अरविंद गिरडकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ मृतकाच्या कुटुंबीयास अंतिम संस्काराकरिता लागणारे सरपण व तेरवीकरिता एक बॅग तांदूळ देण्याचा मनोदय पवन गिरडकर यांनी व्यक्त केला आहे. सद्यस्थितीत ही सेवा विसापूर येथील दारिद्र्य रेषेखालील रहिवाशांकरिता उपलब्ध करून दिली जाणार आहे. गरजूंनी विसापूर येथील गिरडकर यांच्या तिरूपती मंदिर/ तिरूपती अनाज भंडार गडचिरोली येथे संपर्क करावा. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Helping the families of the dead line below