दुचाकी अपघातात इसम जखमी

By Admin | Updated: September 16, 2016 01:53 IST2016-09-16T01:53:07+5:302016-09-16T01:53:07+5:30

गडचिरोली कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या चंद्रशेखर वालदे (४८)

He is injured in a two-wheeler accident | दुचाकी अपघातात इसम जखमी

दुचाकी अपघातात इसम जखमी

कुरखेडा : गडचिरोली कोषागार कार्यालयात उपकोषागार अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या चंद्रशेखर वालदे (४८) यांच्या दुचाकीला अपघात होऊन ते गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास कुरखेडा-कढोली मार्गावरील खैरी फाट्याजवळ घडली.
चंद्रशेखर वालदे हे तळेगाव या आपल्या मुख्य गावावरून दुचाकीने गडचिरोली येथे कर्तव्यावर जात होते. दरम्यान खैरी फाट्याजवळ दुचाकीच्या समोर अचानक कुत्रा आडवा आला. कुत्र्याला वाचविण्याच्या प्रयत्नात त्यांनी दुचाकीचे जोरदार ब्रेक दाबले. त्यामुळे दुचाकी स्लीप होऊन ते दुचाकीसह खाली कोसळले. यामध्ये त्यांच्या पाय, हात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली. घटनेची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, भाजपा तालुका प्रमुख राम लांजेवार, पं.स. सदस्य चांगदेव फाये, नगरसेवक उमेश वालदे यांनी घटनास्थळावर धाव घेत जखमींना तातडीने कुरखेडा उपजिल्हा रूग्णालयात भरती केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: He is injured in a two-wheeler accident