शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर बसेसमध्ये निम्मेच प्रवाशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 05:00 IST

गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून ये-जा करतात. तसेच प्रशासकीय कामे व माेठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे नागपूर मार्गावर धावणाऱ्या बसेसला चांगले उत्पन्न मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जाते. गडचिराेली आगारातून दिवसाला १६ फेऱ्या नागपूरसाठी साेडल्या जातात. जवळपास तेवढ्याच फेऱ्या नागपूरवरून गडचिराेलीसाठीही साेडल्या जातात.

ठळक मुद्देनिर्बंधांचा परिणाम : गडचिराेली बस आगाराला बसताहे आर्थिक फटका

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : नागपुरात काेराेनाचे रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने नागपुरात काही निर्बंध लागू केले आहेत. इतर जिल्ह्यांमधून नागपुरात प्रवेश करणाऱ्या बसेसमध्ये निम्मेच प्रवाशी असावे, असा निर्बंध घालण्यात आले आहेत. याचा फटका गडचिराेली आगाराला बसत आहे. गडचिराेली जिल्ह्यात कार्यरत असलेले अधिकारी व कर्मचारी नागपूर येथून ये-जा करतात. तसेच प्रशासकीय कामे व माेठ्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिक नागपूर येथे जातात. त्यामुळे नागपूर मार्गावर धावणाऱ्या बसेसला चांगले उत्पन्न मिळत असल्याने दर अर्ध्या तासाने बस साेडली जाते. गडचिराेली आगारातून दिवसाला १६ फेऱ्या नागपूरसाठी साेडल्या जातात. जवळपास तेवढ्याच फेऱ्या नागपूरवरून गडचिराेलीसाठीही साेडल्या जातात. या मार्गावर अधिक प्रवासी मिळत असल्याने गडचिराेली आगाराची बरीच भिस्त या मार्गावरून मिळणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे.मात्र, काेराेनाचा वाढता प्रभाव कमी करण्यासाठी नागपुरात बरीच निर्बंध घालण्यात आली आहेत. यामध्ये नागपूर शहरात जाणाऱ्या बसमध्ये केवळ २२ प्रवासीच बसविण्याची अट घालण्यात आली आहे. यासाठी उमरेडपासूनच तपासणी केली जाते. केवळ २२ प्रवासी असल्यास डिझेलचाही खर्च भरून निघणे कठीण हाेत आहे. नागपुरातून येणाऱ्या बसेसमध्येही अर्धेच प्रवासी बसविले जात आहेत. याचा फटका गडचिराेली आगाराला बसत आहे. लाॅकडाऊननंतर एसटी महामंडळाची स्थिती वाईट हाेत चालली आहे. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर विविध निर्बंध लावली जात असल्याने प्रवाशांची संख्या घटत आहे. बसने प्रवास करण्याऐवजी नागरिक खासगी वाहनांचा आधार घेत आहेत. नागपूरला जरी जायचे असले तरी भाड्याचे स्वतंत्र वाहन केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती काेलमडत आहे.

गडचिराेली आगारात दाेन शिवशाहीगडचिराेली आगाराला दाेन शिवशाही बसेस देण्यात आल्या आहेत. या बसेस पूर्णपणे वातानुकूलित आहेत. सामान्य बसपेक्षा या बसची तिकीट अधिक आहे. त्यामुळे या बसला फारसे प्रवासी मिळत नाही. उन्हाळ्यात थाेडेफार प्रवासी मिळतील, अशी अपेक्षा आहे. 

नागपूरमध्ये प्रवेश करतेवेळी बसमध्ये केवळ २२ प्रवासी असणे आवश्यक आहे. तशा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्याने एसटीकडून नियमांचे पालन केले जात आहे. मात्र निम्म्या प्रवाशांमुळे एसटीच्या उत्पन्नावर फार माेठा परिणाम हाेत आहे. - मंगेश पांडे, आगार प्रमुख, बसस्थानक गडचिराेली

१६ बसफेऱ्या राेज

 गडचिराेली आगाराला सर्वाधिक उत्पन्न नागपूर बसफेऱ्यांमधून मिळते. त्यामुळे काही बसेस नागपूर येथे रात्री मुक्कामी राहतात. तसेच सकाळी ५.३० वाजेपासून बसेस नागपूरसाठी प्रत्येक अर्धा ते एका तासाने बसेस साेडल्या जातात. नागपूरसाेबतच आरमाेरी, ब्रह्मपुरी, नागभिड, भिवापूर, उमरेड आदी परिसरात ये-जा करण्यासाठीसुद्धा प्रवासी याच बसेसचा वापर करतात. 

 

टॅग्स :state transportएसटीcorona virusकोरोना वायरस बातम्या