धानबीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

By Admin | Updated: May 29, 2015 01:11 IST2015-05-29T01:11:48+5:302015-05-29T01:11:48+5:30

तालुक्यातील सेवारी येथील शेतकऱ्यांना धानबीज प्रक्रिया, बांधावर खत व खरीपपूर्व नियोजनाबाबत गुरूवारी मार्गदर्शन केले.

Guidance on Paddy Beige Processing | धानबीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

धानबीज प्रक्रियेबाबत मार्गदर्शन

एटापल्ली : तालुक्यातील सेवारी येथील शेतकऱ्यांना धानबीज प्रक्रिया, बांधावर खत व खरीपपूर्व नियोजनाबाबत गुरूवारी मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाचे कृषी पर्यवेक्षक एच. के. राऊत, कृषी सेवक संदीप पैठणे, कृषी सेवक राहूल शेळके आदी उपस्थित होते. धान हे एटापल्ली तालुक्यातील प्रमुख पिक असून या पिकाची पेरणी जूनच्या पहिल्या किंवा आठवड्यात करण्यात येते. तालुक्यातील बहुतांश शेतकरी धानावर बीज प्रक्रिया न करताच धानाची पेरणी करतात. परिणामी धानाची उगवणक्षमता कमी होऊन उत्पादनावरही परिणाम पडतो. त्यामुळे कृषी विभागाच्या मार्फतीने शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन याबाबत मार्गदर्शन केले.
कृषी पर्यवेक्षक एच. के. राऊत यांनी धानाला मिठाच्या पाण्याची कशी प्रक्रिया करावी, याबाबत प्रात्यक्षिक करून दाखविले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Guidance on Paddy Beige Processing