गोंडी धर्मसंमेलन उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:49 IST2021-02-05T08:49:02+5:302021-02-05T08:49:02+5:30

गडचिरोली : तालुक्यातील गिलगाव (बा.) येथे जय सेवा पेरसापेन आदिवासी समितीच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व राणी दुर्गावती ...

Gondi Dharmasammelan in excitement | गोंडी धर्मसंमेलन उत्साहात

गोंडी धर्मसंमेलन उत्साहात

गडचिरोली : तालुक्यातील गिलगाव (बा.) येथे जय सेवा पेरसापेन आदिवासी समितीच्या वतीने क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व राणी दुर्गावती मडावी यांच्या पुतळ्याचे अनावरण व दोन दिवसीय गोंडीधर्म संमेलन पार पडले. या साेहळ्याला परिसरातील शेकडाे आदिवासी बांधव उपस्थित हाेते.

कार्यक्रमाला आ. डॉ. देवराव होळी, मनिरावन दुग्गा, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी सुनीता मरस्कोले, पंचायत समिती सदस्य रमरतन गोहने व जयसेवा पेरसापेन आदिवासी समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. २०२१ मध्ये होणाऱ्या जनगणनेत आदिवासी बांधवांनी धर्माच्या कॉलममध्ये हिंदू धर्म म्हणून नाेंद करावी, असे आवाहन आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केली. तसेच आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित समस्या निकाली काढण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत असे सांगितले. पहिल्या दिवशी मूठपूजा व घटस्थापना भूमक नामदेवराव इनवाते व रामचंद्र काटेंगे यांच्या हस्ते करण्यात आले. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अशोक कुळमेथे यांनी केले. यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष अशोक कुळमेथे, उपाध्यक्ष अंबादास सिडाम, सचिव सुरेश कोडाप व गावातील आदिवासी बांधवांनी सहकार्य केले.

Web Title: Gondi Dharmasammelan in excitement