शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आश्रमशाळांत ‘जीके’ परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2019 6:00 AM

जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते.

ठळक मुद्दे२१ हजार विद्यार्थ्यांचा सहभाग : पोलीस दलातर्फे प्रयास उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये प्रयास उपक्रमांतर्गत २३ आॅगस्टला वीर बाबुराव शेडमाके सामान्य ज्ञान (जी.के.) तिमाही स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला दुर्गम भागातील १०२ आश्रमशाळांमधील २१ हजार ५४७ विद्यार्थी प्रविष्ट झाले.जिल्हा पोलीस दलातर्फे संविधान दिनाचे औचित्य साधून २६ नोव्हेंबर २०१८ पासून दररोज जिल्ह्यातील प्रत्येक आश्रमशाळेत सामान्य ज्ञानावर आधारित १० प्रश्न व्हॉट्सअ‍ॅपद्वारे संबंधित आश्रमशाळेतील समन्वयक म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांना पाठविले जात होते. या शिक्षकांमार्फत सदर प्रश्न दैैनंदिन परिपाठाच्या माध्यमातून आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना माहिती करून दिले जात होते. या सर्व प्रश्नातून ५० प्रश्नांची प्रश्नपत्रिका सामान्य ज्ञान तिमाही परीक्षेसाठी देण्यात आली होती. या परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यास ३ हजार १०० रूपये, द्वितीय क्रमांक पटकाविणाऱ्यास २ हजार १०० व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्यास १ हजार ५०० रूपय रोख, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच क्रमांक ४ पासून पुढील २२ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५०० रूपये व प्रमाणपत्र तसेच आश्रमशाळांतून प्रथम येणाºया विद्यार्थ्यास प्रोत्साहन म्हणून २०० रूपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. दुर्गम भागातील आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास व्हावा. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यासाठी सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. या परीक्षेला उत्स्फूूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनात ही स्पर्धा घेण्यात आली.

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा