शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
2
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
3
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
4
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
5
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
6
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
7
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
8
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
9
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
10
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
11
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
12
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
13
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
14
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
15
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
16
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
17
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
18
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
19
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
20
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी

धक्कादायक! गडचिरोलीतील बालरुग्णालयात सहा महिन्यांत १०० बालमृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:48 PM

गडचिरोली येथील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या शासकीय महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.

 गडचिरोली - येथील अवघ्या सहा महिन्यांपूर्वी लोकार्पण झालेल्या शासकीय महिला व बाल रुग्णालयात बालकांच्या मृत्यूचा आकडा कमी होताना दिसत नाही. पाच महिन्यात १०० पेक्षा जास्त बालकांचा मृत्यू या रुग्णालयात झाला आहे. एवढ्या संख्येने बालमृत्यू होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत हा संशोधनाचा विषय असला तरी दुप्पट रुग्णसंख्येचा भार आणि त्यामुळे वैद्यकीय सेवा देताना रुग्णांची होत असलेली हेळसांड हे सुद्धा एक प्रमुख कारण मानले जात आहे.

लोकार्पणानंतर मे २०१८ पासून हे रुग्णालय पूर्णपणे कार्यान्वित झाले. त्यानंतर जून महिन्यात ३ बालकांचा मृत्यू झाला. जुलै मध्ये २८ बालकांचा, आॅगस्ट मध्ये ३२, सप्टेंबर मध्ये २२ तर आॅक्टोबर महिन्यात जवळपास २० बालकांचा मृत्यू झाला आहे. यात बाळंतपणादरम्यान आणि जंतूसंसर्गामुळे मृत्यू होण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. मृतांमधील ९५ पेक्षा जास्त मुले ० ते १ वर्ष वयाचे आहेत. १०० खाटांच्या या रुग्णालयात सद्यस्थितीत २१७ पेक्षा जास्त रुग्ण भरती आहेत. कधीकधी हा आकडा ३०० वर पोहोचतो. बाळंतपणासाठी येणाºया महिलांसोबतच इतर आजारांच्या महिला आणि बालकांवरही येथे उपचार केले जातात. गडचिरोली जिल्ह्यातील रुग्णांसोबतच लगतच्या चंद्रपूर जिल्ह्यातील रुग्णही याच रुग्णालयात येतात. भरती रुग्णांसोबतच बाह्यरुग्ण विभागाचाही ताण वाढत आहे. अशा परिस्थितीत १०० खाटांच्या रुग्णालयासाठी असलेले वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचारी २०० ते ३०० रुग्णांना सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. रुग्णांची ही हेळसांड थांबवून रुग्णालयाची सेवा अधिक सक्षम व चांगल्या दर्जाची करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. साडेतेरा लाख लोकसंख्येच्या गडचिरोली जिल्ह्यासाठी हे एकमेव महिला व बाल रुग्णालय आहे. त्यामुळे रुग्णसंख्येचा ताण वाढत आहे. २४ तास रुग्णसेवा मिळावी यासाठी रुग्णालय परिसरात असलेले जि.प.सभापती, पं.स.सभापतींचे शासकीय निवासस्थान दुसरीकडे हलवून तिथे वैद्यकीय अधिकाºयांची निवास व्यवस्था करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सूचित केले आहे. - डॉ.देवराव होळी, आमदार, गडचिरोली

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीhospitalहॉस्पिटलHealthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार