गडचिरोली : राज्यात दुर्मीळ असलेला राज्यप्राणी शेकरू, उडणारी खार व राज्यपक्षी हारावतासह दयाळ पक्ष्याची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश आलापल्ली वन विभागाने केला. रविवार, १९ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास जंगलात लपून बसलेल्या १२ शिकाऱ्यांना वनविभागाच्या पथकाने थरारक पाठलाग करून रंगेहाथ पकडले.
आलापल्ली वन विभागाचे पथक गस्तीवर असताना शिकाऱ्यांची टोळी जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वन विभागाच्या पथकाने कारवाई करत शिकाऱ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शिकार केलेले वन्यजीव आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ आणि वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ मधील विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला.
दुर्मीळ वन्यजीवांची शिकार
आरोपींनी ४ शेकरू (महाराष्ट्राचा राज्य प्राणी), १ उडणारी खार, १ हारावत (राज्यपक्षी), १ हरियाल पक्षी, १ दयाळ पक्षी आदी वन्यजीवांची शिकार केली. आरोपींकडून ५ दुचाकी आणि शिकारीचे इतर साहित्य जप्त करण्यात आले.
यांनी केली कारवाई
ही कारवाई आलापल्ली वनविभागाच्या उपवनसंरक्षक दीपाली तलमले, उपविभागीय वन अधिकारी शिशुपाल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी गौरव गणवीर यांनी केली. पथकात क्षेत्र सहायक पुनमचंद बुद्धावार, वनरक्षक दत्ता सुरवसे, नीलेश टेकाम, सुधाकर सोयाम, वाहन चालक सुरेश मडावी आणि चौकीदार श्याम जंजार्लावार, नानाजी मडावी, देवाजी सडमेक यांचा समावेश होता.
Web Summary : Gadchiroli forest officials arrested twelve poachers for hunting protected wildlife. They seized four giant squirrels, a flying squirrel, and other birds. The accused face charges under the Indian Forest Act and Wildlife Protection Act.
Web Summary : गढ़चिरौली वन विभाग के अधिकारियों ने संरक्षित वन्यजीवों का शिकार करने के आरोप में बारह शिकारियों को गिरफ्तार किया। उन्होंने चार विशाल गिलहरियाँ, एक उड़ने वाली गिलहरी और अन्य पक्षी जब्त किए। आरोपियों पर भारतीय वन अधिनियम और वन्यजीव संरक्षण अधिनियम के तहत आरोप लगाए गए हैं।