आसरअल्ली येथील दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:25 IST2021-02-22T04:25:33+5:302021-02-22T04:25:33+5:30

आसरअल्ली येथील चिकन विक्रेता अवैध दारूचादेखील व्यवसाय करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर आसरअल्लीचे ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ...

Filed a case against a liquor dealer in Asaralli | आसरअल्ली येथील दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

आसरअल्ली येथील दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल

आसरअल्ली येथील चिकन विक्रेता अवैध दारूचादेखील व्यवसाय करीत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर आसरअल्लीचे ठाणेदार मंदार पुरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी व मुक्तिपथ तालुका चमूने दारूविक्रेत्याची विचारपूस केली. तपासणीतून २ हजार रुपये किमतीच्या विदेशी कंपनीच्या १० बाटल्या दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी त्या दारूविक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच सिरोंचा शहरातील वाॅर्ड क्रमांक ६मध्ये दारूविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच मुक्तिपथ चमू व सिरोंचा पोलिसांनी दोन महिला दारूविकेत्यांच्या घरांची तपासणी केली. पुष्पा गग्गुरी या महिलेकडून २ लीटर व लक्ष्मी बोगुटा या महिलेकडून १० लीटर गुळाची दारू अशी एकूण १२ लीटर गुळाची दारू नष्ट करण्यात आली. त्यानंतर वाॅर्डातील नागरिकांनी त्या महिलांना पुन्हा दारूविक्री न करण्याची समज दिली.

Web Title: Filed a case against a liquor dealer in Asaralli