नक्षलपीडितांचे उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरूच

By Admin | Updated: July 8, 2015 01:59 IST2015-07-08T01:59:03+5:302015-07-08T01:59:03+5:30

अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथील मूळ रहिवासी असलेले व्यंकटी बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम या दोन नक्षलपीडित सदस्यांनी ....

Fasting of Naxalites continued on the next day | नक्षलपीडितांचे उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरूच

नक्षलपीडितांचे उपोषण दुसऱ्याही दिवशी सुरूच

वैद्यकीय तपासणी : तहसीलदारांनी दिली भेट
गडचिरोली : अहेरी तालुक्याच्या छल्लेवाडा येथील मूळ रहिवासी असलेले व्यंकटी बुर्ले व पुष्पा लिंगाजी गंदम या दोन नक्षलपीडित सदस्यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आमरण उपोषण सुरू केले आहे. मंगळवारी दुसऱ्याही दिवशी त्यांचे उपोषण सुरू होते. दरम्यान, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील गाडे यांचे प्रतिनिधी म्हणून गडचिरोलीचे तहसीलदार जाधव यांनी उपोषण मंडपात येऊन उपोषणकर्त्याची भेट घेतली व त्यांना निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात चर्चेसाठी येण्यास सांगितले. मात्र उपोषण मंडपात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी चर्चेसाठी यावे, अशी मागणी व्यंकटी बुर्ले यांनी केली. त्यामुळे त्यांचे उपोषण दुसऱ्या दिवशी सुरूच राहिले. उपविभागीय पोलीस अधिकारी बाहेर असल्यामुळे चर्चा होऊ शकली नाही. प्रशासकीय स्तरावरून मागण्यांवर चर्चा सुरू असल्याची माहिती बुर्ले यांनी लोकमतशी बोलताना दिली. दरम्यान सकाळी जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोन्ही उपोषणकर्त्यांची वैद्यकीय तपासणी केली. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही, असा निर्धार उपोषणकर्त्यांनी जाहीर केला आहे. नक्षलपीडित कुटुंबाचे लाभ द्यावे, अशी त्यांची मागणी आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Fasting of Naxalites continued on the next day