आठवडा होऊनही ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटविण्यात अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:24 AM2021-06-20T04:24:59+5:302021-06-20T04:24:59+5:30

जंगलात आढळलेला तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करून तिथेच तो पुरण्यात आला. मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तू आणि ...

Failed to identify 'that' body even after a week | आठवडा होऊनही ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटविण्यात अपयश

आठवडा होऊनही ‘त्या’ मृतदेहाची ओळख पटविण्यात अपयश

Next

जंगलात आढळलेला तो मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घटनास्थळीच उत्तरीय तपासणी करून तिथेच तो पुरण्यात आला. मृतदेहाजवळ आढळलेल्या वस्तू आणि चिन्हावरून त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, पण त्यात यश आले नाही. डीएनए तपासणीकरीता नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.

मृत व्यक्तीसंदर्भातील माहिती जिल्ह्यातील तसेच जवळपासचा सर्व पोलीस स्टेशनला देण्यात आली. नजीकचा गोंदिया जिल्ह्यातील केशोरी तसेच काही अन्य पोलीस स्टेशनमध्ये कोणी इसम बेपत्ता असल्याबाबतची तक्रार आहे का याचीही माहिती घेण्यात आली. मात्र मृतदेहाशी त्यांचे ओळखचिन्ह जुळून आले नाही. गेवर्धा येथून मागील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या इसमासंदर्भातील संदेश होता. पण तो बेपत्ता इसम गुजरात राज्यात असल्याची माहीती प्राप्त झाली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळू शकलेली नाही.

(बॉक्स)

हत्या की नैसर्गिक मृत्यू? अंदाज बांधणे कठीण

सदर इसमाचा मृतदेह हा पूर्णपणे कुजलेला असल्याने त्यांचा मृत्यू नैसर्गिक होता की हत्या, याचा अंदाजही लावणे कठीण होते. त्यामुळे आधी त्या व्यक्तीची ओळख पटल्यावरच या प्रकरणाच्या तपासाला दिशा मिळू शकते. ओळख पटविण्याचा कसोशीने प्रयत्न सुरू असल्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Failed to identify 'that' body even after a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.