शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

राज्यबंदीने हिरावला रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सिरोंचा : राज्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचाची सीमा तेलंगणा व छत्तीसगड राज्याला लागून आहे. या सीमेवरच ...

ठळक मुद्देतीन राज्यातील आवागमन बंद : डोंगा व्यावसायिकांनी शोधला पर्यायी व्यवसाय

लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : राज्याच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचाची सीमा तेलंगणा व छत्तीसगड राज्याला लागून आहे. या सीमेवरच प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या आहेत. या नद्यांमधून अनेकजण डोंग्याने आवागमन करायचे. परंतु लॉकडाऊनमुळे डोंगा व्यावसायिकांचा व्यवसाय बुडाला. या व्यावसायिकांनी पर्यायी व्यवसाय शोधला असून त्यावरच ते कुटुंबाची उपजीविका चालवत आहेत.महाराष्ट्राच्या अंतिम टोकावर असलेल्या सिरोंचा तालुक्याला लागूनच प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती नद्या वाहतात. सीमेला लागून असलेल्या तेलंगणा, छत्तीसगड राज्यात सिरोंचा तालुका वासीयांचे रोटी, बेटीचे संबंध आहेत. त्यामुळे तिन्ही राज्यातील नागरिक आवागमन करतात.पुलाअभावी गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील नागरिकांचे आवागमन सुरू आहे. सध्या तिन्ही नद्यांवर सिरोंचा व अहेरी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी पुलाचे बांधकाम झाले असले तरी नदी लगतच्या लोकांना फेरा मारून पुलावरून लांबलचक जाण्यापेक्षा शॉर्टकट नदीतून डोंग्याने प्रवास करणे आवडते. हा प्रवास धोकादायक वाटत असला तरी अंगवळणी पडल्याने अनेकजण नदीतून डोंग्याने प्रवास करतात. त्यामुळे स्थानिक डोंगा चालकांना रोजगार मिळायचा. परंतु लॉकडाऊनमुळे जिल्हा व राज्याच्या सीमाबंद करण्यात आल्या. आकस्मिक स्थितीत तसेच स्थलांतरित मजुरांनाच सीमा पार करून येण्याची परवानगी मिळाल्याने प्रवाशी मिळेनासे झाले. त्यामुळे सध्यास्थिती घाट निर्मनुष्य दिसत आहेत.तीन घाटावरून वाहतूकसिरोंचा तालुक्यात सिरोंचा, पातागुडम, नगरम आदी तीन घाटावरून नदीतून डोंग्याने प्रवास करून दुसऱ्या राज्यातील निश्चित गाव गाठले जायचे. अनेक डोंग्यांमध्ये ४० ते ५० लोकांना बसवून नेण्याची क्षमता होती. दररोज सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत डोंगे चालायचे. परंतु आता डोंगे नदीच्या काठाला बांधून ठेवले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याriverनदी