शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

हत्तीच्या कळपाने नष्ट केले १० एकरांतील धानाचे पुंजणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:00 IST

गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली.

लाेकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : सतत चार दिवसांपासून पिकांची नासाडी करीत असलेल्या हत्तींनी सोमवारी (दि.२९) रात्री परिसरातील सर्वांत मोठे नुकसान केले असल्याची माहिती वनविभागाकडून मिळाली. परंतु यावर कोणतीही उपाययोजना नसल्याने शेतकऱ्यांच्या हातात आलेले धानपिक व कडधान्यांचे नुकसान कसे थांबवावे, ही मोठी गंभीर समस्या झाली आहे. या जंगली हत्तींच्या कळपापासून पिकांचे रक्षण करणे सध्यातरी वनविभागाच्या आवाक्याबाहेर झाले आहे.गेल्या जवळपास दोन आठवड्यांपासून जंगली हत्तींचा कळप धानोरा तालुक्यातून देसाईगंज (वडसा) वनविभागाच्या हद्दीत बस्तान मांडून आहे. सोमवारच्या रात्री या हत्तींनी परिसरातील आतापर्यंतची सर्वात मोठी धानपिकाची नासधूस केली. चिखली तुकुम येथील रहिवासी नित्यानंद बुद्धे यांच्या शेतात रात्री हत्तींच्या कळपाने शिरकाव करून त्यांचे १० एकरातील धानपिक पूर्णतः संपविले, अशी माहिती त्या शेतकऱ्याने दिली. बुद्धे हे रात्री आपल्या काही सहकाऱ्यांसोबत शेतानजीक पाहणी करण्यासाठी गेले असता हत्तीच्या आवाजाने त्यांना तसेच माघारी फिरावे लागले. मंगळवारी सकाळी त्यांनी शेतात जाऊन बघितले असता धान कापून त्यांचे पुंजने करून ठेवलेल्या ठिकाणी हत्तींनी धिंगाणा घातला होता. पुंजण्यांचे नुकसान केले असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधला. वनविभागाने पंचनामे करून तशी मदत शासनाकडून मिळवून देऊ, असे सांत्वन केले.

शेतकऱ्यांची उडाली झोपचार महिने शेतात मेहनत करून हाताशी आलेले धानपीक आता विक्रीसाठी तयार होत आहे. अशात परिसरात हत्तींचा कळप आल्याने तो कधी आपल्या शेतात येईल व शेतमालाचे नुकसान करून जाईल, या भीतीने शेतकऱ्यांनी झोप उडाली आहे. हे संकट दूर करण्यासाठी सध्या कोणताही पर्याय नसून आता परिसरातील शेतकरी वनविभागावरच विश्वास ठेवून आहेत. लवकरात लवकर या संकटातून मुक्त करावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

हत्तींच्या कळपावर लक्ष ठेवण्यासाठी नाईट व्हिजन व ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. तसेच तीन पथक तयार केले आहेत. त्यात एक पथक सतत हत्तींच्या मागावर राहून देखरेख करते. दुसरे पथक नागरिकांमध्ये जनजागृती करते तर तिसरे पथक पंचनामे करून अहवाल सादर करते. - धर्मवीर सालविठ्ठल, विभागीय वनअधिकारी, देसाईगंज

 

टॅग्स :Farmerशेतकरीforest departmentवनविभाग