रस्त्यावरील मातीमुळे वाढला धुळीचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:35 IST2021-03-25T04:35:06+5:302021-03-25T04:35:06+5:30

सिरोंचा शहरातील मुख्य सिमेंट रस्ता बसस्थानक चौक ते ग्रामीण रुग्णालय चौकापर्यंत आहे. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी प्रतिष्ठाने ...

The dust on the roads increased the dust problem | रस्त्यावरील मातीमुळे वाढला धुळीचा त्रास

रस्त्यावरील मातीमुळे वाढला धुळीचा त्रास

सिरोंचा शहरातील मुख्य सिमेंट रस्ता बसस्थानक चौक ते ग्रामीण रुग्णालय चौकापर्यंत आहे. या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी प्रतिष्ठाने तथा पंचायत समिती कार्यालय, ग्रामीण बँक, पोस्ट ऑफिस, ग्रामीण रुग्णालय, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आहे. मुख्य मार्ग असल्यामुळे याच मार्गाने शासकीय कार्यालयात नागरिक ये-जा करतात. दिवसभर पादचारी, दुचाकी, चारचाकी, वाहनांचे आवागमन असते. त्यामुळे दुकानदारांना दिवसभर धुळीचा त्रास होताे. सर्दीसह श्वसनाचे आजार बळावत आहेत. दोन-तीन महिन्यांपूर्वी रस्त्यावरील माती साफ करण्यात आली होती; परंतु माती उचलून न फेकता रस्त्याच्या बाजूला ढकलून दिली. रस्त्याच्या बाजूला असलेली माती वाहनांच्या रहदारीमुळे पुन्हा सिमेंट रस्त्यावर पसरली. त्यामुळे सिमेंट रस्त्यावरील माती स्वच्छ करून विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Web Title: The dust on the roads increased the dust problem