पुष्कर मेळाव्यासाठी गोदातीर भाविकांनी फुलला

By Admin | Updated: July 17, 2015 01:36 IST2015-07-17T01:36:22+5:302015-07-17T01:36:22+5:30

गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्याच्या नदीघाटावर महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नाही.

Dusatiras full of flowers for the Pushkar meeting | पुष्कर मेळाव्यासाठी गोदातीर भाविकांनी फुलला

पुष्कर मेळाव्यासाठी गोदातीर भाविकांनी फुलला

गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर महाराष्ट्र-तेलंगणा राज्याच्या सीमेवरील सिरोंचा तालुक्याच्या नदीघाटावर महाराष्ट्र शासनाकडून कोणतीही तयारी करण्यात आली नाही. मात्र तेलंगणा सरकारने पुष्कर मेळाव्यासाठी मागील सहा महिन्यांपासून व्यापक स्वरूपात तयारी केली आहे. तेलंगणा राज्याच्या पाच जिल्ह्यांतील ३५ नदीघाटांवर गोदावरी तीरावर भाविकांच्या स्रानासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. नदीपात्रात पाईपलाईन टाकून स्नानासाठी शॉवरही तयार करण्यात आले आहे. सिरोंचा तालुक्यात गोदावरी नदीवर पाच घाट आहेत. मात्र सरकारी यंत्रणेकडून या पुष्कर मेळाव्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले. विदर्भाचे मुख्यमंत्री असूनही पुष्कर मेळाव्याकडे दुर्लक्ष झाल्याने सीमावर्ती सिरोंचा भागातील जनता कमालीची नाराज झाली आहे.

Web Title: Dusatiras full of flowers for the Pushkar meeting