शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

नवरगाव येथे तीव्र पाणीटंचाई

By admin | Updated: March 16, 2015 01:20 IST

तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

कुरखेडा : तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील तीन हातपंपही नादुरूस्त असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असतांनाही प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. आंधळी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवगावात जवळपास ५०० लोकसंख्या आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता येथे चार सार्वजनिक विहिरी व पाच हातपंप आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून तीन हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. शिवाय येथील चार विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गावाबाहेर तसेच आंधळी मार्गावरील जि. प. शाळेत हातपंप आहे. परंतु येथे पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्याकरिता झुंबळ उडत असते. दोन्ही बोरवेल गावाबाहेर असल्याने पिण्याच्या पाण्याकरिता नागरिक जातात. परिणामी त्यांना सकाळपासूनच पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. यात अनेकांचा वेळही वाया जातो. त्यामुळे गावातील महिलांमध्ये ग्रा. पं. प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी टंचाई निवारणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा आरोप ग्रामस्थ दुधराम कवाडकर, तानू उईके, तानाजी जांभुळकर, तुळशिराम मानकर, गुणाजी जांभुळकर, योगेश ठलाल व अन्य ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात पं. स. सदस्य चांगदेव फाये यांची विचारणा केली असता, नवरगावची समस्या लक्षात घेता येथे पाईपलाईनचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे योजना कार्यान्वित झाली नाही, पाणीटंचाईचा प्रश्न सोडवू, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)