बंजारा समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

By Admin | Updated: January 10, 2015 01:15 IST2015-01-10T01:15:58+5:302015-01-10T01:15:58+5:30

बंजारा समाजाला आदिवासीप्रमाणे आरक्षण द्यावे, वनहक्क अधिनियमांतर्गत बंजारा बांधवांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी जय सेवालाल बंजारा समाज संघटनेच्यावतीने ..

District Collector of Banjara society attacked | बंजारा समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

बंजारा समाजाची जिल्हा कचेरीवर धडक

गडचिरोली : बंजारा समाजाला आदिवासीप्रमाणे आरक्षण द्यावे, वनहक्क अधिनियमांतर्गत बंजारा बांधवांना जमिनीचे पट्टे देण्यात यावे आदीसह विविध मागण्यांसाठी जय सेवालाल बंजारा समाज संघटनेच्यावतीने शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात अहेरी, मुलचेरा भागातील बंजारा बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या मोर्चाचे नेतृत्त्व बंजारा समाजाचे अध्यक्ष गोवर्धन चव्हाण, सचिव रायसिंग राठोड, किशन पवार, शामराव पवार आदींनी केले. चंद्रपूर मार्गावरील आयटीआय चौकातून दुपारी दीड वाजता मोर्चा निघाला. बंजाराचे समाजाच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. या मोर्चात लचीराम घुगलोत, इरिया चव्हाण, मधुकर बानोत, विनोद अजमेरा, दिपचंद जाधव, सुरेश चव्हाण, नामदेव राठोड, मिठोबा राठोड, रामदास चव्हाण, दिनेश पवार, भपुसिंग राठोड, धनसिंग पवार, सदुसिंग पवार, दिलीप पवार आदीसह शेकडो समाज बांधव सहभागी झाले. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: District Collector of Banjara society attacked