जि. प. अध्यक्षांनी जाणल्या अतिदुर्गम भागातील समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:25 IST2021-07-11T04:25:13+5:302021-07-11T04:25:13+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ...

Dist. W. Problems in remote areas known to the President | जि. प. अध्यक्षांनी जाणल्या अतिदुर्गम भागातील समस्या

जि. प. अध्यक्षांनी जाणल्या अतिदुर्गम भागातील समस्या

गडचिरोली जिल्ह्यातील शेवटच्या टोकावर वसलेल्या भामरागड तालुक्यातील नेलगुंडा गावाला भेट दिली. अतिसंवेदनशील व आदिवासी बहुल क्षेत्र मात्र स्वातंत्र्याच्या ७२ वर्षांनंतरही अविकसित राहिले आहेत. या भागात अनेक प्रमुख समस्या अजूनही कायम आहेत. या गावांना जाण्यास आजही पक्के रस्ते नाहीत. पूल, वीज, पाणीटंचाई, आदी समस्यांकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष असल्याचे गावकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले.

याप्रसंगी नेलगुंडाचे उपसरपंच देवाजी पल्लो, मेडपल्लीचे सरपंच नीलेश वेलादी, माजी सरपंच सुधाकर तिम्मा, ग्रा.पं. सदस्य लालसू आत्राम, मंगेश वड्डे, साधू मडावी, मंजा कनाके, मालू वरसे, पांडुरंग आत्राम, सायबी महाका, लालसू महाका, रामा महाका, मासू वड्डे, चुक्कू महाका, कुमा वेडदा, मंगरू वेडदा, लचू वाचामी तसेच गावातील बहुसंख्य नागरिक हजर होते.

(बॉक्स)

गावात येणारे पहिले जि. प. अध्यक्ष

नेलगुंडा गावाला भेट देऊन समस्या जाणून घेणारे अजय कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत, असे ग्रामस्थांनी यावेळी सांगितले. कंकडालवार यांनी नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतल्या. या भागातील समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: Dist. W. Problems in remote areas known to the President