शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील टीएचओ कार्यालयातून गायब

By admin | Updated: March 3, 2016 01:23 IST

ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या मुख्य अधिकाऱ्यावर आहे. तो अधिकारी म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी.

अनेकांनी सांगितले खोटे कारण : केवळ चार तालुका आरोग्य अधिकारीच कार्यालयात होते हजरगडचिरोली : ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेची अंमलबजावणी करण्याचे काम ज्या मुख्य अधिकाऱ्यावर आहे. तो अधिकारी म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी. मात्र हा अधिकारीच आपल्या कार्यालयात शासकीय कामकाजाच्या दिवशी हजर न राहता विनाकारण गैरहजर राहत असल्याची बाब लोकमत चमूने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आली आहे. गैरहजेरीमागे अतिशय खोटी कारणे या जबाबदार अधिकाऱ्यांनी दिलेली आहेत, असे दिसून आले आहेत.जिल्हा परिषदेमार्फत प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, आरोग्य पथक यांच्या माध्यमातून जिल्ह्याच्या दुर्गम, अतिदुर्गम गावांमध्ये आरोग्यसेवा पोहोचविली जाते. जिल्हा परिषदेच्या आरोग्य यंत्रणेचे काम प्रत्येक तालुक्यात तालुका आरोग्य अधिकाऱ्याच्या अधिनस्त काम चालविले जाते. गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना स्वतंत्र कार्यालय व त्यांच्या दिमतीस मोठी यंत्रणा देण्यात आली आहे. मात्र या यंत्रणेचा कर्णधार असलेला तालुका आरोग्य अधिकारीच बेजबाबदारपणे काम करीत शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या दिवशीही आपल्या कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचे ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमधून उजेडात आले.‘लोकमत’ने ११ तालुक्यांमध्ये मंगळवारी तर कुरखेडा येथे नमूना म्हणून बुधवारी स्टिंग आॅपरेशन करविले. लोकमतची चमू तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते सायंकाळी ५.३० या वेळात पोहोचली. यावेळी फक्त चामोर्शी, आरमोरी, भामरागड व धानोरा या चार ठिकाणीच तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित असल्याचे दिसून आले. लोकमतचा प्रतिनिधी धानोरा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी ते खुर्चीवर टीएचओ नव्हते. ते का आले नाही, हे विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता, ते चहा पिण्यासाठी समोरच्या टपरीवर गेले होते. लोकमतचा कॅमेरा फिरताच ते आपल्या आसनावर स्थानापन्न झाले. मात्र इतर ठिकाणी एकही तालुका आरोग्य अधिकारी लोकमत चमूला दिसला नाही. यातील काही जणांशी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना साहेबांच्या गैरहजेरीबाबत विचारणा केली असता, सबसेल खोटे कारण या जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिले. यावरून दुर्गम भागात अनेक ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी व डॉक्टर जातच नाही, ही बाब पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे.