शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

एसटी बसच्या फेऱ्यांना डिझेल तुटवड्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 06:00 IST

डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे टँकर शनिवारी दुपारी ४ वाजता पोहोचला.

ठळक मुद्देमहामंडळाची आर्थिक स्थिती गंभीर। गडचिरोलीतील काही फेऱ्या रद्द

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली आगारातील डिझेल संपल्याने शनिवारी दुपारच्या सुमारास काही बसफेºया रद्द कराव्या लागल्या. परिणामी बसस्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी उसळली होती.गडचिरोली बस आगार हे जिल्हास्तरावरील आगार आहे. त्यामुळे या आगारातून लांब पल्ल्याच्या बसेस जिल्ह्यातील दुर्गम भागात बसेस सोडल्या जातात. गडचिरोली आगारात एकूण १०९ बसगाड्या आहेत. या बसगाड्यांना दरदिवशी सुमारे सहा हजार लिटर डिझेल लागते. १२ हजार लिटरचे टँकर दोन दिवसात संपते. त्यामुळे दर दिवशी किंवा एक दिवसाआड डिझेलचे टँकर संपते. डिझेलची मागणी करण्यासाठी विभागीय कार्यालयामार्फत इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या खात्यावर आॅनलाईन पध्दतीने पैसे टाकले जातात. त्यानंतर इंडियन ऑईल कार्पोरेशन डिझेलचे टँकर संबंधित आगाराला पाठविते. सध्या एसटी प्रचंड तोट्याचा सामना करीत आहे. डिझेलसाठी पैसे भरण्याबरोबरच कर्मचाऱ्यांचे वेतन, एसटीची किरकोळ दुरूस्ती आदी बाबींवरही खर्च होतो. गडचिरोली आगारातील डिझेल गुरूवारी संपले. डिझेल संपण्यापूर्वीच टँकर बूक करणे आवश्यक होते. मात्र आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या एसटीला वेळेवर पैशांची जुळवाजुळव करून पैसे भरणे शक्य झाले नाही. त्यामुळे टँकर शनिवारी दुपारी ४ वाजता पोहोचला. आगारातील डिझेल ११ वाजताच संपले होते. डिझेल संपल्याने अनेक महत्त्वाच्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. विशेष म्हणजे, १५ दिवसांपूर्वीही दोन ते तीन दिवस आगारातील डिझेल संपले होते. तेव्हाही बऱ्याच बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्या. आजपर्यंत प्रवाशांनी वाहक व चालक नसल्याने बसफेरीला उशीर होत आहे, या गोष्टी ऐकल्या होत्या. आता मात्र डिझेलच संपल्याने बस फेऱ्या रद्द होत असल्याचे प्रवाशी ऐकत आहेत. त्यामुळे त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसत चालला आहे. ही परिस्थिती कायम राहिल्यास महाराष्ट्राची लोकवाहिणी म्हणून ओळख मिळालेल्या एसटीला एसटीला टाळे ठोकण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शिवशाहीने तोटा वाढलागडचिरोली आगाराला दोन शिवशाही बसेस उपलब्ध करून दिले आहेत. या बसमध्ये केवळ पाच ते दहा प्रवाशी बसून जातात. यामुळे डिझेलचा खर्च तर सोडाच वाहक व चालकाचे वेतन करणेही कठीण झाले आहे.

टॅग्स :state transportएसटी