कृतीयुक्त अध्यापनातून मूलभूत क्षमता विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST2021-08-12T04:42:06+5:302021-08-12T04:42:06+5:30

आरमाेरी गटसाधन केंद्राच्या सभागृहात ६ ऑगस्ट राेजी फुलाेरा उपक्रमात सहभागी शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. ...

Develop basic skills through action teaching | कृतीयुक्त अध्यापनातून मूलभूत क्षमता विकसित करा

कृतीयुक्त अध्यापनातून मूलभूत क्षमता विकसित करा

आरमाेरी गटसाधन केंद्राच्या सभागृहात ६ ऑगस्ट राेजी फुलाेरा उपक्रमात सहभागी शिक्षकांची एकदिवसीय कार्यशाळा पार पडली. याप्रसंगी ते बाेलत हाेते. याप्रसंगी मार्गदर्शक म्हणून गटसमन्वयक कैलाश टेंभुर्णे, शिक्षणविस्तार अधिकारी गुलाबसिंग राठाेड, पुरुषाेत्तम चाफले, सुलभक थलाश धाकडे, शेषराव कुमरे, विशेष चाैबे, गाेपाल मेश्राम, मीना बांडेबुचे, साेनाली कात्रटवार, सुनंदा गिरीपुंजे, हेमंतकुमार बिसेन, विनाेद भांबाेरे उपस्थित हाेते. दरम्यान जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे विषय सहायक विठ्ठल हाेंडे यांनी कार्यशाळेला भेट देऊन भाषा व गणित विषयाच्या कृती करवून घेतल्या. तसेच कार्यशाळेच्या सुलभकांनी भाषा व गणित विषयाच्या सर्व कृतींचा आढावा घेऊन मूल्यमापन केले व सविस्तर सुलभन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक शेषराव कुमरे, संचालन साेनाली कात्रटवार, तांत्रिक सहाय्य निकेश बन्साेड, तर आभार करुणा बागेसर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित हाेते.

Web Title: Develop basic skills through action teaching