शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
2
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
3
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
4
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
5
गंगोत्री ते गंगासागर ‘कमळमय’, ऐतिहासिक विजयानंतर पीएम मोदींनी कार्यकर्त्यांचे मानले आभार
6
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
7
अंगारकी संकष्टी चतुर्थी २०२६: ८ राशींवर बाप्पा प्रसन्न, उच्च पद, मान-सन्मान; संकट दूर होईल!
8
VIDEO: पंतप्रधान मोदींचा 'बंगाली लूक' हिट! पारंपरिक धोती-कुर्त्यात भाजप मुख्यालयात एन्ट्री
9
बुमराहनं विकेट घेतली, सेलिब्रेशनही केलं! सायरन वाजल्यावर गावसकरांनी झापलं; नेमकं काय घडलं?
10
Nicholas Pooran Record : निकोलस पूरनचं वादळी अर्धशतक; वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड मोडला
11
Election Results 2026 LIVE: आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त - पंतप्रधान नरेंद्र मोदी
12
सुनेत्रा पवारांच्या ऐतिहासिक विजयावर सुनील तटकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “अजितदादा…”
13
बारामतीत अभिजित बिचुकले-करुणा मुंडेंना NOTAने केले पराभूत; कोणाला किती मते मिळाली? पाहाच
14
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
15
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
16
Video - " गेली १५ वर्षे मार खाल्ला..."; भाजपाच्या विजयानंतर कार्यकर्ता आनंदाने ढसाढसा रडला
17
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
18
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
19
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
20
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यवधी रुपयांचे धान सडल्याचे निदर्शनास आले.

ठळक मुद्देअड्याळ येथे मागील वर्षीचेच धान : अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची आमदारांची मागणी

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी  : चामाेर्शी तालुक्यातील अड्याळ येथे आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने धान खरेदी करण्यात आले; परंतु येथील धान खरेदी केंद्रावरील धानाची उचल मागील वर्षीपासून न झाल्याने कोट्यवधी रुपयांचे धान सडले आहे. या धानाच्या नासाडीला सर्वस्वी जबाबदार संबंधित अधिकारी आहेत. त्यामुळे त्यांना जबाबदार धरून निलंबित करावे, अशी मागणी आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केली आहे. आमदार डॉ. देवराव होळी यांच्या नेतृत्वात धान व मका उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून धान खरेदी केंद्रावर आ. डॉ. देवराव होळी यांनी पाहणी केली असता तेथील अत्यंत धक्कादायक परिस्थिती समोर आली. मागील वर्षीपासून या केंद्रावरील उघड्यावर असलेल्या धानाची उचल न केल्यामुळे येथील कोट्यवधी रुपयांचे धान सडल्याचे निदर्शनास आले. दरवर्षी अशा प्रकारे जाणीवपूर्वक कोट्यवधी रुपयांच्या धानाची नासाडी करण्यात येत असल्याने खरेदी केंद्रावरील धानाच्या नासाडीला आर.एम. व एस.आर.एम.आर. हेच जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांना तत्काळ निलंबित करावे व येथील धानाची तातडीने उचल करावी तसेच मका व धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी मागणी आ. होळी यांनी केली. चामाेर्शी तालुक्यात मागील ५ वर्षांत धान, मका व भाजीपाला लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. सिंचनाची साेय झाल्यानंतर प्रत्येक शेतकरी उन्हाळी पिकांची लागवड करताे; परंतु त्याच्या मालाला भाव मिळत नसल्याने काहीसा हिरमाेड हाेत आहे. काही दिवसातच खरीप हंगामाला सुरूवात हाेणार असल्याने आता पैशांची आवश्यकता आहे.

मका उत्पादक शेतकरी चिंताग्रस्तमागील वर्षीपासून जिल्ह्यात आधारभूत मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. त्यामुळे यावर्षी जिल्ह्यात मका लागवड क्षेत्रात माेठ्या प्रमाणात वाढ झाली. याही वर्षी आधारभूत किमतीत मका खरेदी केंद्र सुरू हाेईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती; परंतु तसे झाले नाही. १ मेपासून आधारभूत मका व रबी धान खरेदी केंद्र सुरू करणे आवश्यक हाेते; परंतु अद्यापही धान व मका खरेदी केंद्र सुरू न झाल्याने मका उत्पादक शेतकरी चिंतीत आहेत.

 

टॅग्स :Devrao Holiदेवराव होळी