अंगणवाडी महिलांची निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST2019-09-30T05:00:00+5:302019-09-30T05:00:51+5:30

अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्या अद्यापही कायम आहेत. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.

Demonstrations of women in Anganwadi | अंगणवाडी महिलांची निदर्शने

अंगणवाडी महिलांची निदर्शने

ठळक मुद्देसरकारविरोधात नारेबाजी : मानधनवाढ लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांच्या मानधनासह विविध मागण्या अद्यापही कायम आहेत. गडचिरोली येथे झालेल्या बैठकीनंतर एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी सरकारच्या धोरणाविरोधात निदर्शने केली.
संघटनेच्या पदाधिकारी वेणू खोब्रागडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. केंद्र शासनाने अंगणवाडी महिलांच्या मानधनात दीड हजार रुपये तर मदतनीसाच्या मानधनात ७ हजार ५०० रुपयांची वाढ घोषित केली होती. मात्र या घोषणेला एक वर्षाचा कालावधी उलटला. मात्र याबाबत अंमलबजावणी झाली नाही. केंद्र शासनाने जाहीर केलेली मानधनवाढ तत्काळ देण्यात यावी, तसेच थकबाकी देण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.
यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रा.रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, सर्व असंघटित कामगारांना किमान वेतन म्हणून १८ हजार रुपये देण्यात यावे. भविष्य निर्वाह भत्ता तसेच पेंशन देण्यात यावे, आदी मागण्यांना घेऊन चंद्रपूर येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे. यात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी बहुसंख्य अंगणवाडी महिला उपस्थित होत्या.

Web Title: Demonstrations of women in Anganwadi

टॅग्स :Teacherशिक्षक